• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टीम इंडियातील करिअरसाठी IPL कर्णधारपद सोडावं लागेल! ऋषभ पंतला कोणी दिला असा सल्ला?

August 22, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचं करिअर सध्या संकटात आहे. कारण टी20 फॉर्मेटनंतर वनडे संघातून त्याला डच्चू मिळालेला आहे. आता फक्त कसोटी संघासाठी त्याचा विचार केला जात असल्याचं दिसत आहे. कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाचा नंबर 1 विकेटकीपर फलंदाज आहे. असं असूनही आता त्याच्या संघातील जागेवरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे त्याला चांगली कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा त्याच्या जागेसाठी बरेच पर्याय आता तयार आहेत.  त्याला टीम इंडियातील करिअर वाचवण्यासाठी काही गोष्टींवर पाणी सोडावं लागणार आहे. यासाठी माजी फलंदाज वसीम जाफरने सल्ला दिला की, आंतरराष्ट्रीय करिअर वाचवण्यासाठी पंतला आयपीएल कर्णधारपद सोडणं भाग आहे.

कर्णधार नाही तर खेळाडू म्हणून खेळावं

वसीम जाफरने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं की, जर आयपीएलच्या पुढच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सने कर्णधारपदाचा प्रस्ताव दिला तर ऋषभ पंतने त्याला स्पष्ट नकार दिला पाहीजे. केएल राहुलचं उदाहरण देत सांगितलं की, कर्णधारपद सोडून फक्त एक फलंदाज म्हणून त्याने चांगला खेळ केला आहे. आयपीएल कर्णधारपदासोबत दबावही असतो असंही सांगण्यास विसरला नाही. ऋषभ पंत मागच्या दोन पर्वापासून लखनौ सुपर जायंट्सचं कर्णधारपद भूषवत होता. तसेच आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण या दोन्ही पर्वात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. कर्णधारपदवरूनही टीका झाली. इतकंच काय तर फलंदाजीतही छाप सोडू शकला नाही.

टीम इंडियात कमबॅकसाठी प्रयत्न करावेत

वसीम जाफरने पंतला स्पष्ट शब्दात सल्ला दिला की, आयपीएलच्या माध्यमातून वनडे आणि टी20 संघात पदार्पणाचं लक्ष्य ठेवायला हवं. पंतने आयपीएलमध्ये सर्वात चांगल्यातल्या चांगल्या कामगिरीवर आणि बेस्ट बॅटिंग फॉर्मवर लक्ष केंद्रीत करावं. त्यामुळे भारतासाठी पुन्हा वनडे आणि टी20 क्रिकेट खेळू शकेल, असं सांगण्यास विसरला नाही. पंतला टीम इंडियातील कर्णधारपदाच्या भूमिकेतूनही वेगळं केलं आहे. त्याच्याकडे असलेलं उपकर्णधारपद काढून घेतल्याने शुबमन गिलच्या गैरहजेरीत त्याच्याकडे जबाबदारी नसणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यामुळे आयपीएलमध्ये जबाबदारी घेण्याऐवजी खेळावर लक्ष केंद्रीत करावं असं वसीम जाफरचं म्हणणं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in