• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

झोपेत असताना साप कधीच जवळ येणार नाही; करा फक्त ही एक सोपी ट्रीक, जंगलांमध्ये लोक असाच वाचवतात आपला जीव

July 1, 2026 by admin Leave a Comment


भारतामध्ये दरवर्षी हजारो लोकांचा साप चावल्यामुळे मृत्यू होतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या लोकांना सर्पदंश झाला आहे, त्यापैकी अनेकांना वेळेत उपचार मिळत नाहीत, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यूची शक्यता वाढते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर सर्पदंशाच्या घटना अधिक वाढतात. विशेष: रात्री झोपेत असताना अनेकदा साप चावल्याच्या घटना घडतात, परंतु झोपेत असल्यामुळे साप चावल्याचं लक्षात येत नाही, त्यामुळे उपचाराला वेळ होतो आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. भारतामध्ये ज्या सापांच्या प्रजाती आढळून येतात, त्यापैकी अवघ्या काही प्रजातीच या विषारी आहेत, यामध्ये मण्यार, फुरसे घोणस आणि नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं म्हणतो. या प्राजी प्रचंड विषारी आहेत.  या चारही सापांच्या प्रजाती महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागांमध्ये आढळून येतात.

यातील सर्वात घातक आणि धोकादायक सापांची प्रजात म्हणजे मण्यार ही एक सापाची अत्यंत विषारी अशी जात आहे. सापांच्या चाव्यामुळे जेवढे मृत्यू होतात, त्याला सर्वात जास्त हा साप जबाबदार असतो. कारण या सापाचं वैशिष्ट म्हणजे हा साप रात्रीच्यावेळी शिकारीसाठी बाहेर पडतो. अनेकदा तो घरात देखील घुसतो. रात्री तुम्ही झोपेत असताना तो तुमच्या अंथरुणामध्ये देखील घुसू शकतो. जर झोपेत चुकूनही तुमचा स्पर्श या सापला झाला तर धोका समजून तो तुम्हाला दंश करतो. या सापाचं वैशिष्ट म्हणजे याला खूप छोटे दात असतात, त्यामुळे तुम्ही जागे असताना देखील हा साप चावल्याचं तुमच्या लक्षात येत नाही, तर झोपेत लक्षात येण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे अनेकदा माणसाचा झोपेतच मृत्यू होतो.

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा सापांपासून वाचण्यासाठी काय करायचं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कधीही जमिनीवर झोपायचं नाही. पूर्वीच्या काळी लोक झोपण्यासाठी बाज वापरत असतं, त्या पद्धतीची बाज तुम्ही वापरू शकतात. या बाजीच्या चारही पायाला दररोज झोपण्यापूर्वी थोडं रॉकेल किंवा पेट्रोल सारखा पदार्थ लावून झोपायचे, यामुळे दोन फायदे होतात, एक तर पेट्रोल, डिझेलच्या वासामुळे साप आसपास फिरकत नाहीत, दुसरी गोष्ट जरी सापाने वर चढण्याचा प्रयत्न केला तर तो पेट्रोल, किंवा रॉकेलमुळे खाली घसरतो, त्याला वर चढणं शक्यत होत नाही. ग्रामीण भागात आजही अनेकजण सापांपासून बचावासाठी ही ट्रिक वापरताना दिसतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in