• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

झटपट, पैसा करा दुप्पट! जाणून घ्या हे बचतीचे स्मार्ट मार्ग, कमाई सुरूच राहणार

August 15, 2026 by admin Leave a Comment


Smart Investment Tips: प्रत्येकाला वाटते, त्याचा पैसा वाढला पाहिजे. कमाई वाढली पाहिजे. रात्रीतूनच पैसा दुप्पट व्हावा असेही अनेकांना वाटते. अनेकांना कोणतीही जोखीम नको असते. मोठे आमिष दाखवून अनेक जण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि त्यांचा पैसा डुबतो. पण योग्य नियोजन केल्यास तुमचा पैसा लवकर वाढू शकतो. काय आहेत स्मार्ट बचतीचे उपाय? त्यासाठी कोणती कराल प्लॅनिंग? जाणून घ्या.

72 चा नियम

पैसा झटपट वाढावा यासाठी सर्वात सोपा फॉर्म्युला ‘Rule of 72’ हा आहे. तुम्ही जिथे गुंतवणूक करत असाल तिथे वार्षिक व्याजाला 72 या संख्येने भागा. जो नंबर येईल. तितक्या वर्षात तुमचा पैसा दुप्पट होईल. म्हणजे एखाद्या बँक एफडीत, मुदत ठेव योजनेवर 6% व्याज मिलते. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला पैसा दुप्पट होण्यासाठी 12 वर्षे लागतील. जर म्युच्युअल फंड सरासरी 12% परतावा देत असेल तर या फॉर्म्युल्यानुसार, पैसा दुप्पट होण्यासाठी 6 वर्षे लागतील. म्हणजे तुम्हाला पैसा लवकर दुप्पट करायचा असेल तर 15% परतावा देणारी गुंतवणूक करावी लागेल.

कंपाऊंडिंगची ताकद

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी कंपाऊंडिंग हे जगातील आठवे आश्चर्य मानले होते. कंपाऊंडिंगचा अर्थ व्याजावर व्याज मिळणे असे आहे. जर तुम्ही 25 व्या वर्षापासून केवळ 2,000 रुपये महिन्याने म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करत असाल आणि त्यावर सरासरी 12-15% परतावा मिळाला तर वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत तुम्हाला 50 लाखांहून अधिकची रक्कम मिळले. जितक्या लवकर गुंतवणूक कराल, पैसा अधिक वेगाने वाढेल. कोणतीही गुंतवणूक करताना ती दीर्घकाळासाठी करणे आणि तिची समीक्षा करत राहणे आवश्यक आहे. गुंतवणुकीबाबात चौकस राहणे फायदेशीर ठरते.  कोणत्याही फसव्या योजनेत गुंतवणूक करणे टाळा. नाहीतर मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नका

पैसा वाढवण्यासाठी तो एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नका. काही ठिकाणी जोखीम स्वीकारा. काही ठिकाणी परंपरागत बचत योजनेत तो गुंतवा. तुमचा गुंतवणुकीचा पोर्टफोलियो संतुलीत ठेवा. इक्विटी वा म्युच्युअल फंडात 60% पर्यंत गुंतवणूक करा. सोन्यात 15-20% पर्यंत गुंतवणूक करा. कारण शेअर बाजार घसरला तर सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. डेट, एफडी, पीपीएफ याठिकाणी सुद्धा गुंतवणुकीचा पर्याय आहे.

डिस्क्लेमर: ही माहिती केवळ माहिती आणि जागरुकतेसाठी आहे, गुंतवणुकीपूर्वी तुमच्या वित्तीय सल्लागाराची मदत घ्या. टीव्ही 9 मराठी गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in