• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिथे प्रेमाची किंमत… खवड्या डोंगर प्रकरणी कुणालच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ, आदल्या रात्रीच…खळबळजनक माहितीने मोठा ट्विस्ट!

August 22, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील त्रिकोणी कुटुंबाच्या दुर्दैवी अंताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. जागोजागी लोक आपल्या पाल्याला मोबाईल आणि आयफोनवरुन समजावून सांगताना दिसत आहेत. या घटनेने जणू भारतीय सामुहिक मनाला धसका बसला आहे. सर्व मोबाईलचा अपरिहार्यपणे सुरु झालेला वापर आणि घराघरात त्यावरुन पालक आणि टिनेजर मुलांमध्ये होणारे वाद आणि नेमकी अशी हादरा देणारी घटना घडल्याने सर्वजण विचारात सापडले आहेत. आता कुणाल चांदगुडे याच्या आईच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

कुणाल याने आयफोनमुळे खवड्या डोंगरावरुन स्वत:ला झोकून देण्यासाठी गेला होता. त्यावेळी तीन तास तेथे त्याची समजूत आई-वडील आणि गावचे सरपंच घालत होते. मात्र, तो काही बधला नाही. त्यानंतर वडील जवळ गेले आणि घात झाला. त्यांचा तोल जाऊन दोघेही कड्यावरुन थेट खाली कोसळले. त्यानंतर आईने स्वत: खवड्या डोंगरावरुन स्वत:ला झोकून दिले. या हृदयद्रावक घटनेनंतर आता कुणाल याची आई संगिता चांदगुडे यांच्याबाबत माहिती उघडकीस आली आहे. संगीता चांदगुडे या युट्युबर होत्या आणि आपल्या युट्युब चॅनेलवर तसेच आपल्या मनातील भावनाही व्यक्त करत होत्या.

विशेष म्हणजे, घटनेच्या आदल्या रात्रीच संगिता चांदगुडे एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी नात्यांमध्ये प्रेमाची आणि भावनांची किंमत न करणाऱ्या व्यक्तींविषयी भाष्य केलं होतं. त्यात त्या म्हणतात की प्रेम आणि आपुलकी दोन्ही बाजूंनी असायला हवी. पोळी जशी दोन्ही बाजूंनी शिजली की चांगली लागते असे उदाहरण त्यांनी दिले होते. “जिथे आपल्या प्रेमाची किंमत नाही, अशा नात्याला अर्थ नाही,” असही त्या म्हणाल्या आहेत. ज्या नात्यात दोन्ही बाजूंनी प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांच्या भावनांची कदर केली जाते, तेच नातं टिकवावं… अन्यथा अशा नात्यातून बाहेर पडणं चांगलं, अशी भावना त्यांनी या व्हिडिओमधून व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

घटनेच्या काही तास आधीच केलेला हा भावनिक व्हिडिओ आता चर्चेत आहे. मात्र, या व्हिडिओचा या दुर्दैवी घटनेशी थेट संबंध होता, असा कोणताही निष्कर्ष सध्या काढता येणार नाही. या व्हिडिओ मागची नेमकी पार्श्वभूमी आणि घटनेशी त्याचा काही संबंध होता का, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in