• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिओने लाँच केला 55 रूपयांचा जिओ टीव्ही प्रो पॅक, ज्याद्वारे तुम्ही फोनमध्ये पाहू शकता 1 हजाराहून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल

July 30, 2026 by admin Leave a Comment


आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच टीव्ही पाहता येतं अस नाही. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण ट्रॅव्हलमध्येचं मोबाईलवर एखादं ॲप डाऊनलोड करून त्यांचे आवडते मुव्ही, सिरीज पाहत असतात. त्यात तुम्हाला मोबाईलवर लाईव्ह टीव्ही पाहण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण रिलायन्स जिओ कंपनीने 55 रूपयांमध्ये एक नवीन JioTV Pro Pack लाँच केला आहे.

या नवीन प्लॅनद्वारे तुम्ही जिओटीव्ही मोबाईल ॲपद्वारे 1 हजाराहून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल पाहू शकता. हा नवीन प्लॅन केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित करणारा कमी खर्चाचा पर्याय शोधणाऱ्या वापरकर्त्यांसाठी आहे. या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची आहे. एक गोष्ट तुम्ही सुरुवातीलाच लक्षात घेतली पाहिजे की, या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग किंवा एसएमएस सारखे फायदे मिळत नाहीत. हा प्लॅन केवळ लाईव्ह टेलिव्हिजन स्ट्रीमिंगवर लक्ष केंद्रित करतो. चला तर मग या प्लॅनचे इतर फायदे जाणून घेऊयात.

JioTV प्रो पॅकमध्ये काय समाविष्ट आहे?

रिलायन्स जिओच्या म्हणण्यानुसार , या पॅकमध्ये वापरकर्त्यांना 16 हून अधिक भाषांमधील 1 हजाराहून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहता येतील, ज्यात 150 हून अधिक प्रीमियम चॅनेल्सचा समावेश आहे. यामध्ये मनोरंजन, चित्रपट, बातम्या, मुलांचे कार्यक्रम, जीवनशैली आणि प्रादेशिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सबस्क्राइबर्सना जिओस्टार, सोनी एंटरटेनमेंट, सन टीव्ही नेटवर्क, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी आणि ईटीव्ही यांसारख्या ब्रॉडकास्टर्सचे चॅनेल्स पाहता येतील.

त्याच बरोबर या प्‍लॅनसोबतच हे ही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या प्लॅनमध्ये जिओस्टार आणि सोनी स्पोर्ट्स चॅनेलचा समावेश नाही. 55 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज केल्यानंतर वापरकर्त्यांना फक्त जिओ टीव्ही ॲप उघडून त्यांच्या जिओ मोबाईल नंबरने लॉग इन करायचे आहे. कोणतीही वेगळी ॲक्टिव्हेशन प्रक्रिया होणार नाही आणि रिचार्ज केल्यानंतर पात्र प्रीमियम चॅनेल त्वरित उपलब्ध होतात. हे सबस्क्रिप्शन मोबाईल डिव्हाइसवर चालते आणि प्रीपेड व पोस्टपेड दोन्ही जिओ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

ही योजना कोणासाठी आहे अधिक फायदेशीर?

हा नवीन पॅक अशा वापरकर्त्यांसाठी आहे जे प्रामुख्याने त्यांच्या स्मार्टफोनवर टेलिव्हिजन पाहतात आणि ज्यांना बंडल केलेल्या टेलिकॉम लाभांची आवश्यकता नाही. हा केवळ मनोरंजनासाठीचा पॅक असल्याने या सेवेचा वापर करण्यासाठी ग्राहकांकडे आधीपासूनच सक्रिय जिओ प्रीपेड किंवा पोस्टपेड कनेक्शन असणे आवश्यक आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in