
स्नेहल मेंगळ : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यूजर्सला एकापेक्षा एक शानदार प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. कंपनीकडे असे अनेक प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये संपूर्ण 1 महिन्याची वैधता मिळते. त्यापैकी एक म्हणजे जिओचा नवीन 219 रूपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. हा कमी बजेटमध्ये 30 दिवसांची वैधता देणारा प्लॅन पर्याय म्हणून अनेक ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 दिवसांची सेवा वैधता मिळते. त्यामुळे ज्यांना महिनाभरासाठी मोबाईल सेवा सुरू ठेवायची आहे आणि जास्त डेटा किंवा महाग प्लॅनची गरज नाही, त्यांच्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण या प्लॅनमध्ये कोणते फायदे आहेत जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओचा 219 रूपयांच्या डेटा प्लॅन
जिओच्या 219 रूपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये 30 दिवसांचा हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळतो, ज्यामुळे तुम्हाला मनसोक्त इंटरनेटचा आनंद घेता येईल. मात्र या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एसएमएसद्वारे बोलण्यासाठी 100 एसएमएसचा सविधा मिळत नाही. तसेच या प्लॅनच्या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला कोणाशीही व्हॉईस कॉलवर बोलण्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळत नाही. कारण जिओचा हा 219 रूपयांचा रिचार्ज पॅक फक्त डेटा रिचार्ज आहे, त्यामुळे यामध्ये कॉलिंग आणि एसएमएस सारख्या सेवा उपलब्ध नाहीत.
तर रिलायन्स जिओचा हा 219 रूपयांचा रिचार्ज केल्यावर तुम्हाला पूर्ण 30 दिवसांची वैधता मिळते. याचा अर्थ तुम्ही महिनाभर कोणत्याही त्रासाशिवाय इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. तर या रिचार्जमधील डेटा संपल्यावर त्याचा वेग कमी होऊन 64 Kbpsच्या स्पीडने त्याचा वापर करू शकता.
जिओचा हा रिचार्ज पॅक अशा ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकतो, ज्यांना दैनंदिन कामांसाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. ऑनलाइन काम, सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग, शिक्षण किंवा इतर डिजिटल सेवांसाठी सतत डेटाची गरज असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरू शकतो. कमी खर्चात दीर्घ वैधता आणि इंटरनेट सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना हा पॅक फायदेशीर ठरेल.
Leave a Reply