• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिंदगी ना मिलेगी दोबारा: आयुष्यात या 5 रोड ट्रिप एकदा अनुभवाच…

August 16, 2026 by admin Leave a Comment


1- गुवाहाटी-तवांग रोड ट्रिप नॉर्थ-ईस्टचे सौदर्य जर पाहायचे असेल तर आयुष्यात एकदा तरी गुवाहाटी ते तवांग रोड ट्रिप करायला हवी. हिमालयाच्या रांगात वसलेल्या सुंदर रोड ट्रिप पैकी ही एक मानली जाते. सुमारे ४८० किमीचा हा प्रवास गुवाहाटीपासून सुरु होऊन भालुकपोंग, बोमडिला, दिरांग आणि सेला पासून तवांगपर्यंत पोहचतो.या मार्गावर मध्ये मैदानी प्रदेश, घनदाट जंगल, डोंगर दऱ्या, धबधबे आणि बर्फाने झाकलेले पर्वत तुमचा प्रवास अविस्मरणीय करतील.

2- गोवा-गोकर्ण रोड ट्रिप भारतातील सर्वात सुंदर रोड ट्रिप पैकी गोवा ते गोकर्ण हा प्रवास मानला जातो. जर तुम्हाला समुद्र, हिरवा निसर्ग आणि कोकणचे सौदर्य जवळून पाहायचे असेल तर ही रोड ट्रिप एकदा एक्सप्लोर करुन पाहाच. मार्गात नारळी-पोफळीच्या बागा, समुद्राची गाज, किनाऱ्यावरील गावे आणि पश्चिम घाटाची सौदर्य तुमच्या आठवणीत कायमस्वरुपी नोंदल्या जातील. ही रोड ट्रिप गोव्यापासून १०५ किमीचा समुद्र किनारा आहे. गोकर्णला पोहचल्यानंतर तुम्ही ओम बिच, कुडले बिच, हाफ मून बिच आणि पॅराडाईज बिचचा आनंद घेऊ शकता. तसेच ओम बिचचा आकार खरोखरच ओम अक्षरासारखा आहे.

3- अहमदाबाद ते कच्छ रोड ट्रिप गुजरातची संस्कृती आणि तेथील वाळवंटी भागाचे सौंदर्य जवळून अनुभवयाचे असेल तर तुम्ही अहमदाबादहून कच्छ मार्गाने रोड ट्रिप करु शकता. या ३३० किलोमीटरच्या मार्गावर प्रवासात लहान शहरे आणि गावांची भेट होते. कच्छची पांढरी वाळू तुम्हाला मोहवून टाकते. पांढऱ्या शुभ्र मिठाचे पठार, निरभ्र निळे आकाश आणि येथील सूर्यास्त खरोखरच अविस्मरणीय आहे. प्रवासादरम्यान, तुम्ही कच्छची लोककला, संगीत, नृत्य, हस्तकला आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा अनुभव घेऊ शकता.

4- चेन्नई-पुदुचेरी रोड ट्रिप जर तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यांचे सौदर्य दाखवणारा प्रवास करु इच्छीत असाल तर चेन्नई ते पुदुचेरीला कार किंवा बाईकने जाऊ शकता. सुमारे १५० किमी लांबीचा हा प्रवास चेन्नई पासून सुरु होत महाबलीपुरम आणि कडलूर क्षेत्रातून जात पुदुचेरीपर्यंत जातो. मार्गात एकीकडे बंगालची खाडीचा समुद्र तर दुसरीकडे हिरवा निसर्ग, छोटी गावे किनाऱ्यावरील सौदर्य याचा शानदार अनुभव घेता येतो. या दरम्यान तुम्ही बिचवर थांबून सुर्योदय आणि सुर्यास्ताचा मनोहारी नजारा पाहू शकता.

5- विशाखापट्टनम ते अराकू व्हॅली रोड ट्रिप जर तुम्हाला पर्वत, घनदाट जंगल आणि दरीखोऱ्यांचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा तुम्ही विशाखापट्टनम ते अराकू व्हॅलीचा रस्ते मार्गाने प्रवास करायला हवा. या ११५ किमीच्या प्रवासात तुम्ही उंचावर जाता तेव्हा तेथील निसर्गाचा आनंद तुम्हाला घेता येतो. कारण पूर्व घाटाची हिरवाई आणि सुंदर पर्वत तुमचे मनमोहन घेतील. या रोड ट्रिपची सर्वात मोठी खासियत म्हणजे वळणदार डोंगरातील मार्ग आणि सुंदर दरीखोऱ्यांचा प्रांत तुम्हाला पाहाता येतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in