• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जा बुडून मर..; ‘लक्ष्मणा’च्या मुस्लीम सुनेनं सुनावलं, नेमकं काय घडलं?

April 21, 2026 by admin Leave a Comment


‘बिदाई’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सारा खानने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेता क्रिश पाठकशी लग्न केलं. क्रिश हा रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांचा मुलगा आहे. या लग्नामुळे सारा आणि क्रिश यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मुस्लीम असून हिंदू मुलाशी लग्न केल्याने अनेकजण सारावर टीका करत आहेत. अशाच एका ट्रोलरची कमेंट वाचून साराचा संताप अनावर झाला आणि तिने त्याला सुनावलं. साराने संबंधित युजरचा मेसेज इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

साराने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एका मेसेजच्या स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या खासगी आयुष्यातील निवडींवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. एका युजरने सारावर दुसऱ्या धर्मातील मुलाशी लग्न केल्याबद्दल मन दुखावणारी कमेंट केली होती. संबंधित युजरने लिहिलं, ‘संपूर्ण जगात तुला लग्न करण्यासाठी फक्त एक हिंदू मुलगाच भेटला का? ही अत्यंत दु:खद आणि निराशाजनक गोष्ट आहे. तू तुझ्या नावापुढील खान हे आडनाव काढून टाक. तू आता मुस्लीम राहिली नाहीस.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Saaraa Khan Pathak (@ssarakhan)

युजरच्या याच मेसेजचा स्क्रीनशॉट साराने शेअर करत लिहिलं, ‘निराश??? इतकी दु:खद गोष्ट वाटत असेल तर जा याच निराशेत बुडून मर.’ आता साराचं हे उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. साराने 6 ऑक्टोबर 2025 रोजी क्रिश पाठकशी कोर्ट मॅरेज केलं. सारा आणि क्रिशची भेट एका डेटिंग अॅपद्वारे झाली होती. जवळपास वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. ‘अखेर आम्ही एकत्र आलो. दोन वेगवेगळ्या आस्था आहेत, परंतु स्क्रिप्ट एकच आहे आणि खूप सारं प्रेम आहे. कुबूल है पासून सात फेऱ्यांपर्यंत. येत्या डिसेंबर महिन्यात आम्ही विधीवत लग्न करू. दोन हृदय, दोन संस्कृती.. आता कायमसाठी एक झाले’, अशा शब्दांत साराने भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये दोघांनी हिंदू आणि मुस्लीम पद्धतीने लग्न केलं.

क्रिशने ‘पीओडब्ल्यू: बंदी युद्ध के’ आणि ‘ये झुकी झुकी सी नजर’ यांसारख्या शोजमध्ये काम केलंय. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांचा तो मुलगा आहे. सुनील लहरी यांनी दोनदा लग्न केलंय. त्यांचं पहिलं लग्न राधा सेनशी झालं होतं. परंतु या दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नव्हता. त्यानंतर त्यांनी भारती पाठक यांच्याशी दुसरं लग्न केलं. क्रिश हा सुनील आणि भारती यांचाच मुलगा आहे. परंतु क्रिश नऊ महिन्यांचा असतानाच सुनील लहरी यांचा दुसरा घटस्फोट झाला. त्यामुळे क्रिशला आई भारती यांनीच लहानाचं मोठं केलं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SAW vs INDW : टीम इंडियासाठी करो या मरो सामना, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला रोखणार?
  • पाळणा हलणार! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…
  • PPF मधून व्हा करोडपती! दरमहा 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 41 लाखांचा परतावा
  • किआचा धमाका! नवी ‘Syros’ लाँच, किंमत 27 हजारांनी कमी आणि फीचर्समध्ये मोठी वाढ
  • IPL 2026 Points Table : घेणं नाय देणं, दिल्लीच्या पराभवाचा राजस्थानला फटका, हैदराबादची झेप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in