• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जाऊन हे तुझ्या बायकोला सुनव.. पापाराझीच्या कमेंटवर अंजली आनंद भडकली; कॅमेऱ्यासमोरच घेतली शाळा

September 9, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री  अंजली आनंद ही टीव्ही आणि बॉलिवूडमधील नावाजलेला चेहरा आहे. तिने अनेक टीव्ही शोज तसेच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट च्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातलं तिजं काम, तिची भूमिकाही गाजली. याच अंजली आनंदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेही दिसला. दोघेही त्यांच्या मित्र-मंडळींसोबत बाहेर गेले होते आणि एकाच कारमध्ये दिसले. यावेळी पापाराझींनी त्याचे फोटो चिपले. अंजली सर्वांशी हसून बोलत होती. मात्र जाता-जाता एका पापाराझीने तिच्यावर अशी कमेंट् केली की अंजलीचा राग अनावर झाला. क्षणभरााचाही वेळ न दवडता अंजलीने तिथल्या तिथे कॅमेरासमोरच त्या पापाराझीला फटकरालं आणि थेट सुनावलं. असं काय म्हणालसी अंजली ? तिथे नेमकं काय घडलं होतं ?

अंजली ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलेल्यान अंजलीने अनेक बेध़क विधानंही केली. ती बॉडी पॉझिटिव्हीटबद्दल बोलते आणि स्पष्टवक्तेपणासाठी फेमस आहे.

शिव ठाकरेसोबत दिसली अंजली

इतर मित्र-मंडळींना भेटून अंजली आणि शिव ठाकरे नइघाले, ते कारमध्ये बसत होते, तेव्हा वातावरण एकदम छान, हलकंफुलकं होतं. कारमध्ये बसताना अंजलीने शिवला मजेत म्हटलं तू मध्ये बस, त्यावर पापाराझी तिला म्हणाले, तुम्हीही आत बसा. यावर अंजली म्हणली मी त्याच्यापेक्षा थोडी जास्त उंच आहे ना. तर शिव ठाकरेनेही त्याच्या मैत्रीणीच्या आगामी फिल्मचं प्रमोशन केलं. अंजलीचा पिक्चर येतोय, तुम्ही सगळे तो नक्की बघा , असंही त्याने सांगितलं.

पापाराझीच्या कमेंटवर भडकली अन्..

शिव ठाकरे कारमध्ये बसला, त्याच्या मागोमाग अंजली कारमध्ये बसत होती, मात्र तेव्हाच एका पापाराझीने कमेंट केली. शिव भाईला दाबून टाकू नका, असं तो तिला मजेत म्हणाला. मात्र पापाराझीचं हे बोलणं अंजलीला बिलकूल आवडलं नाही आणि तिच्या रागाचा पारा चढला. तिने तिथल्या तिथे त्याला फटकारलं आणि जाऊन हे बॉडी शेमिंग तुझ्या बायकोसोबत कर – अस तिने त्याला सुनावलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmy Flag ⛳ (@filmyflag)

त्यानंतर रागाच्या भरातच असलेल्या अंजलीने ड्रायव्हरला कार चालवण्यास सांगितली आणि ती तिथून निघून गेली. अंजलीचं हे थेट प्रत्युत्तर, तिचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय. पापाराझींच्या कमेंटवर अंजलीने सुनावल्या बद्दल अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 80s Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सुपरहिट; पण फोटो बनवताना सावधान! ‘या’ चुका टाळा, नाही तर…
  • मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका, आता ट्रम्प काय करणार? जगाचं लक्ष
  • नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी….
  • व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता…
  • Amruta Fadanvis : ते माझे भाऊ; अमृता फडणवीसांचं जरांगें पाटलांना जेवणाचं निमंत्रण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in