
आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सवर नामुष्की ओढावली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित करो या मरोच्या स्थितीवर येऊन पोहोचलं आहे. मुंबई इंडियन्स संघ चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित सोडवायचं असेल तर उर्वरित सहा सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. एकही पराभव झाला तर प्लेऑफचं गणित चुकेल. मुंबई इंडियन्सची अशी दुर्दशा होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे दिग्गज खेळाडूंचा फॉर्म.. यात पहिलं नाव येतं ते दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहचं.. आतापर्यंत जसप्रीत बुमराह 8 सामन्यात खेळला असून फक्त दोनच विकेट घेता आल्या आहेत. त्यामुळे त्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. कारण मोक्याच्या क्षणी वापरलं जाणारं हत्यार बोथट झालं आहे. त्यामुळे वारंवार पराभवाचं तोंड पाहावं लागत आहे. त्याच्या खराब फॉर्मबाबत फलंदाज प्रशिक्षक कायरन पोलार्डने वक्तव्य केलं आहे.
मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्डने जसप्रीत बुमराहच्या फॉर्मबाबत सांगितलं की, आम्ही कमनशिबी आहोत हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही कायम लोकांच्या नजरेत असतो. त्यामुळे जेव्हा कधी खराब कामगिरी करतो तेव्हा सर्वांच्या नजरेत येतो. सामान्य लोकं नोकरी करताना चुकीचा ईमेल पाठवला तरी ती सुधारण्याची संधी असते. पण आम्हाला ती संधी मिळत नाही. जसप्रीत बुमराहला ओळखत असल्याने मला माहिती आहे की तो पुन्हा एकदा उंची गाठेल आणि बळी घेईल. आम्हाला आशा आहे की तो लवकरच आपला फॉर्म मिळवेल आणि जुन्या लयीत येईल. पण सध्या तरी आपण त्याला थोडा वेळ दिला पाहिजे.
मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. यावर कायरन पोलार्ड म्हणाला की, ‘आम्ही या स्पर्धेतून अद्याप बाहेर पडलेलो नाहीत आणि आम्ही हारही मानलेली नाही. आम्ही फक्त परत जाऊन पाहू की या हंगामात आम्ही किती पुढे जाऊ शकतो.’ मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 2 मे रोजी होणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे.
Leave a Reply