• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जरांगे पाटलांनी घेतली रोहित पवारांची भेट; आंदोलन स्थळावरून रोखठोक भूमिका, नेमका काय दिला सल्ला?

June 14, 2026 by admin Leave a Comment


सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु त्यामध्ये अशी एक अट आहे, की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना आधी ही उर्वरीत रक्कम भरावी लागणार आहे, त्यानंतरच शेतकऱ्यांना या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. मात्र ही अट सरकारने रद्द करावी आणि सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे, त्यांनी आपल्या या मागणीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची तब्येत खालावली आहे, बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपूर येथे रोहित पवार यांची भेट घेतली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

शेतकरी वाचला नाही तर राज्य, देश कसा चालणार? असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना तुम्ही कितीही पोटतिडकीनं आंदोलन केलं तरी लोकं त्याला राजकारणच समजणार.  या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पाहिलं पाहिजे, शेतकरी म्हणून रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा.  रोहित पवारांनी जीआरमध्ये शब्दचा खेळ कसा असतो ते दाखवून दिलं. मी इथे आलो, त्यामुळे आता काही लोक  मला  रोहित पवारांचा माणूस म्हणून बोलायला लागतील. मोदी पवारांना जीव लावतात मग, आंदोलनाची वेळ का?  जर सरकार चर्चेसाठी बोलावत असेल तर चर्चेतून मार्ग काढा, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान उपोषण करणं हे खूप कठिण काम आहे, माझे हाडं ठिसूळ झाले आहेत.  डॉक्टरांना सलाईन लावण्यासाठी माझी नस सापडत नव्हती, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आज रोहित पवार यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Earthquake : जगात हाहाकार… पहाटे पहाटे आक्रोश आणि किंकाळ्या…10 हजार लोकांचा मृत्यू? व्हेनेझुएलात भूकंपाने दहशत
  • Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांचा दावा खरा, फक्त सिया आणि चेतन नाही तर तिसरा व्यक्तीही… मोठा ट्विस्ट..
  • Ketan Agarwal Murder Case : साखरपुड्यापासून ते हत्येपर्यंत… केतन अग्रवाल प्रकरणात कधी काय काय घडलं?
  • जग हादरलं… 7.1 आणि 7.5 … भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के, त्सुनामीचा अलर्ट, मोठी खळबळ
  • Horoscope Today 25th June 2026 : जे नोकरीच्या शोधात मिळणार गुड न्यूज, दिखाऊपणा टाळा, नाहीतर.. वाचा मेष ते मीनचं आजचं भविष्य !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in