• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जमिनीचं खोदकाम सुरू असताना सापडली अशी वस्तू, एका रात्रीत गावाचं नशीब बदललं, व्हिआयपी लोकांची लागली रांग

August 3, 2026 by admin Leave a Comment


विचार करा तुम्ही शेती करण्यासाठी किंवा त्या जमिनीवर एखादी इमारत बांधण्यासाठी जमीन खोदत आहात, परंतु जमीन खोदत असताना जर जमिनीच्या आतून एखादी अशी वस्तू निघाली जिचा तुम्ही कधीही विचार केला नसेल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणारच ना? असंच एका व्यक्तीसोबत देखील घडलं आहे. ज्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी एक जमीन साफ करण्याचं काम हाती घेतलं होतं, ही जमीन खोदत असताना त्याला तिथे 160 वर्ष जुने तब्बल 200 पेक्षा जास्त तोफेचे गोळे आढळून आले आहेत. हे तोफ गोळे 160 वर्षांपूर्वी झालेल्या गृह युद्धातील असावेत असा अंदाज इतिहास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. ही घटना मिसिसिपीमधील आहे. जमीन खणण्याचं काम सुरू होतं, तेव्हा तिथे आधी दहा ते पंधरा तोफेचे गोळे आढळून आले, त्यानंतर त्या परिसरात मेटल डिटेक्टरच्या मदतीने शोध घेतला असता, या जमिनीत पाच, दहा नाही तर तब्बल 200 तोफेचे गोळे आणि काही शस्त्रं देखील आढळून आले आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हे तोफेचे गोळे पाहून इतिहास तज्ज्ञांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना अमेरिकेतल्या मिसिसिपी प्रांतामधील बूनविले गावातील आहे. हेरोल्ड नाईट असं या व्यक्तीचं नाव आहे, या गावात हेरोल्ड नाईट नावाच्या व्यक्तीची जमीन आहे, तिथे व्यवसाय सुरू करायचा म्हणून तो त्या जमिनीची सफाई करत होता. खोदकाम सुरू असतानाच त्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या जमिनीमधून तोफ गोळे वर येण्यास सुरुवात झाली, पाच नाही दहा नाही तर तब्बल 200 तोफ गोळे या ठिकाणी आढळून आले आहेत, तसेच तिथेच काही शस्त्र देखील आढळून आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गावात जोरदार चर्चा सुरू झाली. सोबतच गावामध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं.

त्यानंतर याची माहिती इतिहास तज्ज्ञांना देण्यात आली, त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला, एखाद्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात तोफ गोळे आढळून येणं ही पहिलीच घटना आहे. हे तोफे गोळे 160 वर्ष जुने, गृह युद्धातील असावेत असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे, सध्या हे तोफ गोळे स्वच्छ करून, सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहेत, त्याबद्दल अधिक अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. दरम्यान या गावात हे तोफ गोळे सापडल्यामुळे हे गाव एका रात्रीत प्रसिद्ध झालं आहे,  हे गाव पहाण्यासाठी व्हिआपी लोकांची रांग लागली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in