• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला चुकीचं उत्तर दिलं तर काय होतं? किती वर्ष जेलमध्ये जावं लागतं?

August 15, 2026 by admin Leave a Comment


भारतामध्ये 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेची जोरदार तयारी सुरू आहे. गृहमंत्रालयाकडून त्या 40 प्रश्नांची यादी देखील तयार करण्यात आली आहे, जे प्रश्न जनगणनेच्यावेळी विचारण्यात येणार आहेत. या जनगणनेच्या माध्यमातून जी माहिती गोळा केली जाते, जसं की देशात एकूण लोकसंख्या किती आहे? लोकांच्या रहाण्याचा दर्जा तसेच सामाजिक, आर्थिक स्थर याबद्दलची माहिती सरकारला मिळते, या माहितीचा फायदा हा सरकारला पुढील दहा वर्षांचं नियोजन करताना होतो, दरम्यान आता जनगणनेची सुरुवात होण्यासाठी अवघे काही महिने बाकी आहेत, परंतु अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, समजा जर जनगणनेची माहिती विचारताना आपण जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर काय होतं? आपल्याला शिक्षा होऊ शकते का?

जनगणनेच्या वेळी अधिकारी जे प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांची उत्तर योग्य देणं, तसेच कोणत्याही प्रकारची खोटी माहिती न देणं बंधनकारक असतं. 1948 अंतर्गत तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सर्व खरी माहिती देणं, त्यांची कुठल्याही प्रकारची दिशाभूल न करणं हे तुमचं कायदेशीर कर्तव्य आहे. कारण जनगणनेच्या माध्यमातून ज्या माहितीचं संकलन होतं, ती माहिती देशातील आरोग्य व्यवस्था, नागरिकांचे रहाणीमान, देशातील पायाभूत सुविधा यांचं नियोजन करण्यासाठी महत्त्वाची असते.

जर तुम्ही जनगणनेच्या कामासाठी आलेल्या अधिकार्‍याला जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली, अथवा त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो एक गुन्हा मानला जातो, त्यासाठी तुम्हाला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते, किंवा एक हजार रुपयांचा दंड देखील होऊ शकतो. काही प्रसंगात दंड आणि जेल अशा दोन्ही शिक्षा एकाच वेळी होऊ शकतात, त्यामुळे जनगणनेच्या कामासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना योग्य ती माहितीच दिली पाहिजे, जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊ नये. समजा तुम्ही जर तुमची माहिती जाणीवपूर्वक चुकीची दिली नसेल, अनावधानाने तुमच्याकडून चुकीची माहिती गेली असेल तर अशा स्थितीमध्ये तुमच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, मात्र चुकीची माहिती दिली तर मात्र शिक्षा होऊ शकते.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in