• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जग हादरलं… 7.1 आणि 7.5 … भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के, त्सुनामीचा अलर्ट, मोठी खळबळ

June 25, 2026 by admin Leave a Comment


भूकंपाच्या भयानक धक्क्यांनी व्हेनेझुएला प्रचंड हादरलंय. बुधवारी संध्याकाळी काही मिनिटांच्या अंतराने व्हेनेझुएलामध्ये दोन मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे राजधानी काराकसमध्ये अनेक इमारती कोसळल्या आणि घाबरलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आणि आणखी धक्के बसण्याच्या भीतीमुळे राजधानीतील नागरिक अजूनही घराबाहेरच आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलामध्ये लागोपाठ दोन शक्तिशाली भूकंप झाले. ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’च्या (USGS) माहितीनुसार, पहिल्या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी होती, तर अवघ्या काही मिनिटांनंतर झालेला दुसरा भूकंप अधिक तीव्र होता आणि त्याची तीव्रता 7.5 इतकी नोंदवली गेली. या भूकंपांनंतर, ‘यूएस पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर’ने पोर्तो रिको आणि व्हर्जिन आयलंड्ससाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

बातमी अपडेट होत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पंचायत, द फॅमिली मॅनपेक्षाही तगडी रेटिंग; 6 वर्षांपासून कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड
  • Operation Tiger: त्या खासदारांना धनुष्यबाण नव्हे कमळ घ्यायचे होते हाती? 6 वा खासदार फोडला कोणी? मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई कामी? ती इनसाईड स्टोरी
  • Ketan Agarwal Murder Case : सिया गोयल पोहचणार फाशीच्या फंद्यापर्यंत, पोलिसांना मोठे यश, थेट 18 जूनचा..
  • Vaibhav Sooryavanshi: 19 चौकार अन् 6 षटकार, वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा मैदानात धुमाकुळ
  • Ketan Agarwal Case : पोलिसांसमोर सिया गोयलने उघडले सर्व राज, का केली केतनची हत्या? कारण ऐकून पोलिसही थक्क…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in