• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगातील शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर, भारताला मोठा धक्का, सर्वात मजबूत पासपोर्ट कोणत्या देशाचा?

July 5, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर आली आहे, ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत एका नंबरने पिछाडीवर गेला आहे. ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची पासपोर्ट रँकिंग एक नंबरने घसरून 125 व्या स्थानावर पोहोचली आहे. तर नामेबियाची पासपोर्ट रँकिंग 124 व्या स्थानावर आहे. तर अजबैजानची पासपोर्ट रँकिंग ही 126 व्या स्थानावर आहे. सर्वसाधारणपणे विविध देशांच्या पासपोर्टची रॅकिंग ही व्हिसा फ्री ट्रॅव्हलवर ठरवली जाते. मात्र ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स मध्ये पासपोर्टची मजबूती ही ग्लोबल मोबिलिटी, गुंतवणुकीची क्षमता आणि जीवनमानाचा दर्जा या सारख्या घटकांवरून ठरवली जाते.

ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सकडून एकूण 197 देशांच्या पासपोर्टची रँकिंग जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारताची रँकींग सध्या स्थितीमध्ये 125 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी भारत 124 व्या स्थानावर होता, त्यात आता एका अंकांची घसरण झाली आहे. या रिपोर्टनुसार सध्या स्थितीमध्ये भारत 26 देशांना व्हिसा फ्री एन्ट्री देतो. ज्यामध्ये भूटान, जमायका, मकाओ, नेपाळ, फिलिस्थान, ट्यूनीशिया, अंगोला यासारख्या देशांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 88 देशांमध्ये भारतीय नागरिकांना प्रवासासाठी व्हिसाची गरज लागते.

कोणत्या देशाचा पासपोर्ट टॉप स्थानावर?

ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या यादीत स्विडन नंबर एक स्थानावर आहे, त्यानंतर स्विझर्लंडचा नंबर लागतो, तिसऱ्या स्थानावर फिनलँड, चौथ्या स्थानावर जर्मनी, पाचव्या स्थानावर नेदरलँड, सहाव्या स्थानावर आयरलँड, सातव्या स्थानावर युके, आठव्या स्थानावर नॉर्वे तर नवव्या स्थानावर सिंगापूर हे देश आहे. अमेरिकेची रँकिंग घसरली असून, अमेरिकेच्या पासपोर्टला टॉप टेनमध्ये स्थान मिळू शकलेलं नाहीये. चीनची रँगिकं 104 वी असून, पाकिस्तानची रॅकिंग 188 वी आहे.

अमेरिकेला मोठा धक्का

दरम्यान अमेरिकेला देखील या रँकिंगमध्ये मोठा धक्का बसल आहे. अमेरिकेच्या रँकिंगमध्ये घसरण झाली असून, त्यांनी टॅप टेनमधील स्थान गमावलं आहे, या यादीमध्ये अमेरिका आणि फ्रान्स हे दोन्ही देश अनुक्रमे 11 व्या स्थानावर आहेत. हा अमेरिकेसाठी देखील मोठा धक्का आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in