• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘छातीकडे टक लावून पहायचा…’ नाशिक TCS कंपनीतील पीडितांचं बोलणं ऐकून झोपच उडेल, एकेक कारनामे…

April 23, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत जे काही घडलंय, त्याचे डिटेल्स हादरवणारे नाहीत तर ते ऐकून अक्षरश: घृणा येते. तिथल्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागलेला त्रास, अपमान, मानहानी याचे एकेक तपशील पुढे येत असून आरोपींनी काय लेव्लहर्यंत त्यांना टार्गेट केलंय ते त्यातून स्पष्ट होतंय. आता आणखी एका पीडित महिलेने पुढे येऊन जबाब दिला आहे, तिने जे आरोप केलेत, ते ऐकून तर तुमची झोपच उडेव. 11 वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या महिलेचा आरोप आहे की तिला 4 वर्ष, थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 4 वर्षं लैंगिक छळ, अश्लील टिप्पणी आणि तिच्या खाजगी आयुष्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी सहन करावी लागली. अनेक तक्रारी करूनही कंपनीने आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही असाही तिने आरोप केला आहे.

यापूर्वी, कंपनीतील सात ते आठ कर्मचाऱ्यांच्या टोळीने टेलिमार्केटर किंवा असोसिएट म्हणून काम करणाऱ्या महिलांना कसं टार्गेट केलं ते उघड झालं होतं. आरोपींनी पीडितांचा लैंगिक छळ केला, त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केला तसेच त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल व धार्मिक प्रथांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचंही उघड झालं होतं. मात्र हा प्रकार फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांसोबतच घडला असं नाही तर, टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या एका महिलेलाही आरोपींनी टार्गेट केल्याचं नुकतंच उघड झालं आहे. तब्बल 4 वर्ष हा छळ सुरू होता. पीडितेने तिच्या वरिष्ठांकडेही अनेक वेळा तक्रार केली होती, पण काहीच कारवाई झाली नाही.

कपडे, शरीर, रूपावर कमेंट्स

नाशिक टीसीएसमध्ये पीडितेला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला, ती अत्यंत अपमानजनक आणि खेदजनक होती. तक्रारी करूनही, दोषींवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. या सेंटरमध्ये कपडे, शरीर, रूप आणि इतर बाबींवर टिप्पणी करणे ही एक सामान्य बाब होती असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

पीडितेच्या जबाबानुसार, “मी गेल्या 11 वर्षांपासून टीसीएसमध्ये काम करत असून आणि गेल्या सात वर्षांपासून टीसीएसच्या नाशिक शाखेत टीम लीडर म्हणून कार्यरत आहे. लीडरशिप टीममध्ये सहा जण असून, ते सर्व ऑपरेशन्स हेड अश्विनी चैनानी आणि इतर अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतात. मी 27 पुरुष आणि महिला सहकाऱ्यांवर देखरेख करते “.  पुढे पीडितेने सांगितलं की, ” मी ज्या विभागात काम करते, तिथे आम्ही बँक क्रेडिट कार्डधारकांचे कॉल हाताळतो. ऑफिसमध्ये माझ्यासह इतर पाच टीम लीडर आहेत. आम्ही दोन शिफ्टमध्ये काम करतो : पहिली शिफ्ट सकाळी 8 ते 5 पर्यंत आणि दुसरी शिफ्ट सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी असते.”

” दानिश शेख, तौसीफ शेख, रझा मेमन, शफी शेख, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी आणि आणखी एक जण आमच्या ऑफिसमध्ये काम करतात; मी त्यांना चांगलं ओळखते. या लोकांनी ऑफिसमध्ये एक टोळी बनवली आणि ते जाणूनबुजून इतर धर्मांच्या कर्मचाऱ्यांचा छळ करायचे. मूर्तींबद्दल अपमानकारक टिप्पणी, अश्लील शेरेबाजी करायचे आणि महिलांना डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत असत “, असं पीडितेने तिच्या जबाबात नमूद केलं.

2022 मध्ये काय घडलं ?

2022 साली जे घडलं तो भयानक अनुभव पीडीतेने सांगितला. ” ते 2022 साल होतं. मी एका मीटिंगमध्ये होते. शफी शेख माझ्यासमोर सुमारे तीन फूट अंतरावर उभा होता. अचानक माझ्या लक्षात आले की तो माझ्या छातीकडे एकटक पाहत होता आणि हसत होता. मला खूप अस्वस्थ वाटलं. मी तिथून लगेच उठून निघून गेले. मला अक्षरश: रडू कोसळलं. त्यानंतर मी या घटनेबद्दल दुसऱ्या टीम लीडरला सांगितलं, ज्याने माझी बाजू घेतली आणि मला एका सीनिअर मॅनेजरकडे नेलं.  जे काही घडलं ते मी पूर्ण समजावून सांगितलं आणि ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. पण त्यानंतर शफी शेख याचं फक्त  डिपार्टमेंट बदलण्यात आलं, एवढीच कारवाई करण्यात आली.” असं पीडितेने नमूद केलं.

” यानंतरही त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. तो विनाकारण माझ्याभोवती घुटमळयचा आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. मी (त्याच्याकडे) अनेक वेळा त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण तो काही थांबला नाही. माझ्याशिवाय इतर अनेक महिला कर्मचाऱ्यांनीही त्याच्याबद्दल तक्रार केली होती, पण कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.” असंही तिने सांगितलं.

मूल नाहीये ? तुला एक नंबर देतो..

पुढे पीडितेने अंगावर काटा आणणार अनुभव सांगितला,. ती म्हणाली, ” फेब्रुवारी 2026 मध्ये जे झालं ते मी कधीच विसरू शकणार नाही. नुकताच माझा गर्भपात झाल्यामुळे मी त्यावेळी खूप अस्वस्थ होते. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत, तौसीफ अत्तार माझ्याकडे आला आणि त्याने माझ्या तब्येतीची विचारपूस केली. जेव्हा मी त्यांना माझी परिस्थिती समजावून सांगितली, तेव्हा त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले आणि विचित्र नजरेने बघितलं. मग तो मला म्हणाल, मी तुला अजमेरमधील एका मौलवीचा नंबर देतो. तू तिकडे गेली, तर तुला नक्कीच मूल होईल. त्याचं हे बोलणं ऐकून मी पूर्णपणे खचून गेले. माझ्या खाजगी आयुष्याबद्दल आणि इतक्या संवेदनशील विषयावर असं बोलणं माझ्यासाठी खूप अपमानकारक होतं. पण त्यावेळी मी काहीच बोलले नाही, मात्र मी त्याला स्पष्टपणे नकार देऊनही त्याने माझ्याशी (त्याबद्दल) बोलण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर 2022 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान, टीसीएस नाशिकमध्ये काम करणारा शफी शेख, मीटिंग्ज दरम्यान माझ्या छातीकेड एकटक पाहत असे”, असा आरोपही पीडितेने केला आहे. .

चार वर्ष सहन केला हा प्रकार

” 2022 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत हाच प्रकार सुरू होता. मीटिंग असो की ऑफीस, सगळीकडे माझ्याकडे एकटक पाहिलं जायचं. माझे कपडे, शरीर, माझं खासगी आयुष्य – सगळ्या गोष्टींवर कमेंट्स केल्या जायच्या. मी शफी शेख आणि तौसीफ अत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे”, असं पीडितेने सांगितलं. तिच्या याच तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाडक्या लेकीसोबत फरदीन खानचा डान्स; नेटकरी म्हणाले ‘इंटरनेटवरील सर्वांत गोड व्हिडीओ’
  • Petrol Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार? आखातातील तणावादरम्यान सरकारकडून सर्वात मोठी अपडेट
  • सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्षांआधी पैसे काढता येतात का? जाणून घ्या काय सांगतो नियम
  • IPL 2026 Purple Cap : ऑक्शनमध्ये फक्त 30 लाखात विकत घेतलं, आता पर्पल कॅपच्या शर्यतीत बनला नंबर 1, स्टार गोलंदाजांना टाकलं मागे
  • तुमची तुळस वारंवार सुकतेय? मग आजच कुंडीत एक चमचा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in