• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘चोली के पिछे…’, गाण्याचा वाद, आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी खडसावलेलं, ‘सामना’मध्ये स्पष्ट लिहून आलेलं…

August 30, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित स्टारर ‘खलनायक’ सिनेमातील ‘चोली के पिछे क्या है’ गाणं प्रदर्शित झालं, आजही कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमात हे गाणं वाजतं… पण प्रदर्शनापूर्वी हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं. अशात सिनेमा प्रदर्शित करुच द्यायचा नाही… यासाठी देखील आंदोलनं होऊ लागली. यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुभाष घाई यांनी मोठा खुलासा केला. सांगायचं झालं तर, तेव्हा संजय दत्त देखील वादाच्या भोवऱ्यात अडकलेला. त्यांची मदत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. तर ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्यावर सुरु असलेल्या वादावर देखील सुभाष घाई यांची मदत बाळासाहेब ठाकरे यांनी केली.

सांगायचं झालं तर, ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्यावर तब्बल 32 संस्थांनी आक्षेप घेतेला होता. गाण्याला होणारा विरोध देखील प्रचंड तिव्र होता. अनेक संघटनांनी तर, ‘खलनायक’ सिनेमाचा विरोध करत, सिनेमावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. याच कारणामुळे सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष घाई 32 संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घ्यावी लागली.

सुभाष घाई म्हणाले, ‘पुणे आणि दिल्लीत आंदोसनं सुरु झाली. विशेषतः महिला संघटनांकडून जास्त विरोध केलेला. मी सर्वांना सांगितलं किमान आधी सिनेमा तर पाहा… तुम्हाला वाटतं तसं सिनेमात काहीही नाही. पण त्यांनी मला उत्तर दिलं, अनेकांचं असं म्हणणं आहे की, सिनेमा प्रचंड अश्ली आहे…’, हैराण करणारी गोष्ट म्हणजे, शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी झालेला…

यावर सुभाष घाई म्हणाले, ‘शिवसेनेचे कार्यकर्ते देखील पुढे आल्यानंतर मी बाळासाहेब यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना सांगितलं, ‘माझा खलनायक सिनेमा प्रदर्शित होणार आहे, कृपया एकदा सिनेमा पाहा. त्यांनी सिनेमा पाहिला आणि दुसऱ्या दिवशी ‘सामना’ वृत्तपत्रात लिहून आलं की, लोकांनी सिनेमा हवा तसा अर्थ काढयचा तर काढा, पण सिनेमा चांगला आहे. तो चोली के पिछे क्या है गाणं, ते चोलीच्या मागेच आहे…’, यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला खडसावलं. त्यानंतर वातावरण बदललं आणि सिनेमा प्रदर्शित झाला.. असं देखील सुभाष घाई म्हणाले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 42 वर्षीय व्यक्तीने वाढलेले वजन झटपट केलं कमी; ‘या’ 4 सवयी ठरल्या गेमचेंजर
  • Kriti Sanon: क्रिती सनॉनमुळे नाही तर या कारणामुळे हटवली जाहिरात; GIVAच्या मालकांनी सांगितलं खरं कारण
  • प्रेमानंद यांच्या भक्तीने आकर्षित होऊन अनवाणी पायांनी स्वामिनारायण नदीकिनारी उभे राहायचे कारण…
  • 2 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्याशिवाय आता कोणतीच पार्टी पूर्ण होत नाही, ऐकलं की प्रेक्षक करू लागतात डान्स
  • कुवेतचा पाकिस्तानला जोरदार धक्का, संरक्षण करारानंतर घेतला मोठा निर्णय, थेट भारतात..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in