• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चीनच्या नव्या निर्णयानं जगभरात त्सुनामी, आता संपूर्ण व्यापारच होणार ठप्प, उडाला हाहाकार

April 16, 2026 by admin Leave a Comment


युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. जरी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील स्ट्रीट ऑफ होर्मूजमध्ये अजूनही मोठा तणाव पहायला मिळत आहे. एकीकडे इराणकडून स्ट्रीट ऑफ होर्मूजवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, दिवसभरात फक्त 15 जहाजांनाच या मार्गाने जाण्याची परवानगी इराणकडून देण्यात आली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील हा मार्ग ब्लॉक केला आहे. यामुळे जगावर दुहेरी संकट निर्माण झालं आहे. आम्ही फक्त इराण पोर्टच्या जहाजांनाच आडवणार असं जरी ट्रम्प यांनी म्हटलं असलं तरी देखील परिस्थिती कधीही बदलू शकते, जगाला जेवढं कच्चं तेल आणि गॅसची गरज आहे, त्यातील 25 टक्के वाहतूक या मार्गाने होते, तर भारताला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील सुमारे 40 टक्के पुरवठा या मार्गाने होतो. त्यामुळे सध्या भल्या-भल्या देशांची झोप उडाली आहे.

दरम्यान दुसरीकडे आता चीन मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. चीनच्या नव्या निर्णयामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. चीनने आता होर्मूज पेक्षाही मोठा रस्ता बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. चीनचा फिलिपाइन्स आणि जपानसोबत वाद सुरू आहे, याचदरम्यान आता चीनने दक्षिण चीनी समुद्राचं प्रवेश द्वार आंशिक स्वरुपात बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. चीनने स्कारबोरो शोलच्या जवळ जहाजांच्या तैनातीला सुरुवात केली आहे. चीन जहाजांच्या मदतीने आता हा मार्ग बंद करणार आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

जगासाठी सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग

जर चीनने हा मार्ग बंद केला तर जगभरात मोठा हाहाकार उडू शकतो. कारण जगभरातील एकूण 33 टक्के व्यापार याच मार्गाने होतो. जर चीनने या मार्गाला ब्लॉक केलं किंवा कंट्रोल केलं तर जगभरातील व्यापार ठप्प होऊ शकतो. सिंगापूर, फिलिपाइन्स, जपान आणि चीन याच मार्गाने व्यापार करतात. या मार्गावरील अधिकांश भागावर पूर्वीपासूनच चीनने ताबा मिळवला आहे, आता चीन हा मार्ग पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे. चीनने जर हा मार्ग बंद केला तर जगतील तब्बल 33 टक्के व्यापार पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे, यामुळे पुन्हा एकदा तणाव वाढू शकतो.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 स्पर्धेत आरसीबी नवा इतिहास रचण्याच्या वेशीवर, असं करताच 14 वर्षे जुना विक्रम मोडणार
  • नर्गिससोबत बोलायचं आहे… आतल्या खोलीत नेलं अन्… सोलापूर भयंकर घटनेनं हादरलं
  • जर तुम्ही दररोज हे 8 सुपरफूड्स खाल्ले तर रहाल स्लिम आणि फिट
  • घरच्या घरी सोप्या पद्धतीनं तूप कसं बनवायचं ? जाणून घ्या
  • आयपीएलमधील तीन संघांना झालं 60 कोटींचं नुकसान! कोट्यवधींची रक्कम मोजून पश्चातापाची वेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in