• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चक दे इंडिया! महिला हॉकी संघाने इंग्लंडला रडवलं, सामना ड्रॉ करत स्पर्धेतून बाहेर काढलं

August 20, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील करो या मरोचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. या सामन्यात पहिल्या क्वॉर्टरपासून दोन्ही संघांनी तीव्र लढत दिली. त्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता होती. कारण या सामन्याच्या निकालावरच पुढच्या फेरीचं गणित ठरणार होतं. त्यामुळे दोन्ही संघांनी कडवी झुंज दिली. एका गोलसाठी दोन्ही संघांनी चांगलाच घाम गाळला. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे गोल स्थिती 0-0 अशी होती. त्यामुळे क्वॉर्टरमधील 15 मिनिटात काय होते याची उत्सुकता होती. इंग्लंडने चौथ्या क्वॉर्टरमध्ये जास्तीत जास्त चेंडू जवळ ठेवून चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न केला. पण इंग्लंडला काही जमलं नाही. अखेर हा सामना 0-0 ने बरोबरीत सुटला आणि भारताने क्रॉसओव्हर फेरीत धडक मारली. तर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

गट ड मध्ये चीनने दक्षिण आफ्रिकेचा 5-1 असा पराभव केल्यामुळे ते पहिल्या स्थानावर राहिले. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. त्यामुळे क्रॉसओव्हर फेरीत भारताचा सामना अ गटातून पात्र ठरलेल्या नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियाशी होईल. या फेरीतीय दोन सामन्यांनंतर जे अव्वल दोन संघ असतील, ते थेट सेमीफायनल खेळतील.

भारतीय महिला संघाची स्पर्धेतील कामगिरी

हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पहिला सामना ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या चीनशी झाला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनचं मोठं आव्हान होतं. हे आव्हान भारतीय संघाने यशस्वीरित्या पेललं आणि चीनला 2-2 ने बरोबरी रोखलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा उडवला. दक्षिण अफ्रिकेला 6-1 ने पराभूत केलं. वुमन्स हॉकी वर्ल्डकपच्या इतिहासातील हा भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. विशेष म्हणजे भारताच्या सहा वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल मारले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in