• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चंद्राबाबू नायडूंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक, या खास कारणामुळे त्यांच्या मनात मोदींच विशिष्ट स्थान

June 9, 2026 by admin Leave a Comment


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे. भारताची सर्वाधिक काळ सेवा करणाऱ्या पंतप्रधानांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. देश प्रथम हा त्यांचा सिद्धांत आहे. मागच्या 12 वर्षाच्या शासन काळात भारतीय जनतेने त्यावर विश्वास दाखवला आहे. प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीला आधुनिक प्रशासनासोबत जोडत त्यांनी जागतिक मंचावर भारताचा आत्मविश्वास पुनर्स्थापित केला आहे. मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि सहकारी संघवादाच्या माध्यमातून 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र बनण्याचं लक्ष्य ठेऊन नव्या स्वर्णिम युगाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांचा एक विशेष लेख नुकताच एक वर्तमानपत्रात प्रकाशित झाला. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा दीर्घ कार्यकाळाचा रेकॉर्ड मागे टाकल्याचा उल्लेख केला. मोदी यांचं नेतृत्व आणि त्यांच्या दूरदृष्टीचं हे यश असून भारतीय जनतेचा अतूट विश्वास हा त्याचा पुरावा आहे असं चंद्राबाबू नायडू यांनी लेखात म्हटलं आहे.

योग्य नेत्याच्या रुपात नरेंद्र मोदी मिळाले

देश प्रथम या सिद्धांतावर आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासन शैलीचं चंद्रबाबू नायडू यांनी कौतुक केलं. “मी अनेकदा म्हणतो की, भारताला योग्यवेळी, योग्य नेत्याच्या रुपात नरेंद्र मोदी मिळाले आहेत. मागच्या 12 वर्षात हा विश्वास अधिक मजबूत झाला आह. इतिहास केवळ आर्थिक विकास आणि राजकीय स्थिरतेसाठी नाही, तर भारताचा आत्मविश्वास पुनर्जीवित करण्याचा कालखंड म्हणून लक्षात ठेवेल” असं चंद्रबाबू नायडू म्हणाले.

चंद्रबाबू यांच्या मनात मोदींबद्दल विशिष्ट स्थान का?

चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या पाच दशकाच्या सार्वजनिक जीवनात अनेक पंतप्रधानांना जवळून बघितलं, यात नरेंद्र मोदी यांचं विशिष्ट स्थान असल्याचं नायडू म्हणाले. याच कारण म्हणजे त्यांनी प्राचीन भारतीय सभ्यतेला आधुनिक प्रशासनिक व्यवस्थेशी यशस्वीरित्या जोडलं. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं भारताच्या मनात आपल्या ओळखी बद्दल संकोच होता. पण मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपली सांस्कृती गौरव भावना आणि राष्ट्रीय आत्मविश्वास परत मिळवला आहे असं नायडू यांनी लेखात लिहिलय.

रणनितीक परिवर्तनाचं उदहारण

“प्राणायाम आणि ध्यान या भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरांना आधुनिक टेक्नोलॉजी आणि डिजिटल प्रशासनाशी जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 व्या दशकाला नवी दिशा प्रदान केली आहे. मागच्या एका दशकात भारत 11 व्या क्रमांकावरुन चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला हे रणनितीक परिवर्तनाचं उदहारण आहे” असं चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in