• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड, कोणत्या विषयावर चर्चा?

July 18, 2026 by admin Leave a Comment


Chandrashekhar Bawankule meetsDevendra Fadnavis: नागपूरमध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन होत आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीबाबत मोठे दावे करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होत असून पुढील राजकीय समीकरणांची चर्चा होत आहे. त्यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज सकाळीच रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.

जयंत पाटील अर्थमंत्री?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा होत आहे. जयंत पाटील हे राज्याचे नवीन अर्थमंत्री असतील असा दावा करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सतेज पाटील यांनी हा दावा फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या घडामोडी घडत असताना फडणवीस आणि बावनकुळे यांच्या भेटीला मोठे महत्त्व आले आहे.

ठाकरेंच्या आंदोलनावर बावनकुळेंची टीका

उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण हा केवळ ढोंगीपणा आहे. जनाधार कमी झाल्यामुळे त्यांना प्रभू श्रीराम आठवला. मतांची बँक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. जनाधार गेल्यावर आता त्यांनी भूमिका बदलली आहे. प्रभू श्रीराम आमच्यासाठी राजकारणाचा विषय नसून आस्था, संस्कार आणि संस्कृतीचे प्रतिक आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आले होते. पण ते अयोध्येत आले नाही. आता वोट बँकेसाठी ठाकरेंना प्रभू श्रीराम आठवल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

फडणवीसांचा 22 जुलै रोजी वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. नागपूरमध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. रामरक्षा आंदोलनाचे बॅनर लावण्यासाठी परिसरात जागा उरली नसल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तर राऊतांनी फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना रामरक्षा पठण करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यावरून भाजपच्या गोटातून हल्लाबोल सुरू झाला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी
  • chanakya Niti : चाणक्य यांचे फक्त 5 सल्ले ऐका, आयुष्यात होईल आमूलाग्र बदल; वाचा…
  • 1 September Rashifal : सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल, वाचा तुमच्या राशीत नेमकं काय आहे?
  • 6 ते 7 थार, 2 स्कॉर्पिओ, 3 जेसीबी, 8 ट्रॅक्टर, अनेक दुचाकी जिंकून देणाऱ्या ओम्याचा खुराक काय होता ? ऐकाल तर चाट पडाल
  • Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार ऐनवेळी संकटात सापडणार, काँग्रेसच्या 2 मंत्र्यांकडून थेट इशारा; काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in