• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरुन ऑफिसचं काम करताय? ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष

April 29, 2026 by admin Leave a Comment


कोरोना महामारीच्या काळात एकमेकांसोबत अधिक संपर्क यायला नको म्हणून अनेकांनी वर्क फ्रॉम होम करण्यास सुरुवात केली. पण घरुन काम करण्याऱ्यासाठी देखील काही नियम वास्तूशास्त्रात दिले आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आहे. विशेषतः घराला. प्रत्येकाच्या आयष्यात घर हा एक हळवा विषय आहे. कारण अनेक भावना घराची जोडलेल्या असतात. आपण दिवसाची सुरुवात घरातच करतो आणि दिवसभराचा सर्व थकवा घरीच घालवतो. म्हणूनच घर बांधताना आपण वास्तूला इतके महत्त्व देतो. घर बांधल्यानंतरही, आपण तिथे कोणती वस्तू ठेवतो, प्रत्येक गोष्ट कुठे करतो आणि तिची दिशा काय असावी, या सर्वांना खूप महत्त्व असते. अशात, काही लोक घरूनच काम करतात.

घरून काम करणाऱ्या लोकांना थकवा जाणवणे आणि मानसिक संघर्ष होणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत, वास्तूशास्त्रानुसार घरात काही बदल केल्यास समाधान मिळू शकेल. वास्तूच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. विद्यार्थी असोत वा कर्मचारी वातावरण चांगले असेल तरच एकाग्रतेने काम करणे शक्य होते. शिवाय, कुटुंबात आनंद आणि शांतता टिकवून ठेवायची असेल, तर खालील गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे.

वास्तूनुसार, घरातून काम करताना दक्षिण किंवा पश्चिम दिशा निवडणे उत्तम असते. म्हणजेच, जर तुम्ही लॅपटॉपवर काम करत असाल, तर लॅपटॉप दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे सर्वोत्तम आहे. या दिशेला लॅपटॉप ठेवल्याने तुमच्या जीवनात आणि कामात सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यास मदत होईल. असे केल्याने तुम्हाला मनःशांती मिळण्यासही मदत होईल. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष वाढते आणि कर्मचाऱ्यांना कामात यश मिळते. असे केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंधही सुधारतील.

ज्या टेबलावर तुम्ही लॅपटॉप किंवा पुस्तके ठेवलेली असतात, ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवा. तुम्ही कचरा नसलेल्या स्वच्छ जागेत काम केले पाहिजे. टेबलावरील कागदपत्रे आणि अनावश्यक वस्तू तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यामुळे कामातील अनेक गोष्टींमध्ये अडथळा तर येतोच, शिवाय तणावही वाढतो. म्हणून, टेबल नेहमी स्वच्छ ठेवणे चांगले.

तुमच्या कॉम्प्युटर डेस्कवर किंवा तुम्ही काम करत असलेल्या खोलीत सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वस्तू ठेवा. काही प्रकारचे सुविचार, चित्रे किंवा पुतळे ठेवणे चांगले असते. हे मनाला आनंद आणि शांती देण्यासाठी खूप चांगले आहे. कारण जेव्हा तुम्हाला थकवा किंवा तणाव जाणवतो, तेव्हा या गोष्टी तुमच्या समोर असल्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा आणि शांती मिळण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, आरशासमोर काम करू नका कारण प्रतिबिंबांमुळे नेहमी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

तुमच्या कॉम्प्युटर डेस्कवर चाकू सारख्या धारदार वस्तू कधीही ठेवू नका. यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात. असेही मानले जाते की यामुळे आपली मनःशांती भंग पावते आणि मानसिक ताण वाढतो. म्हणून, तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी तुमच्या सभोवतालच्या गोष्टींमध्ये बदल करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pratap Sarnaik | आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास…प्रताप सरनाईक यांचा इशारा; सरकारचे पुढचे पाऊल!
  • ठाकरे गटाचे धक्कातंत्र, उद्धव ठाकरे नव्हे तर या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी, ऐनवेळी मोठी घोषणा!
  • 8 वर्षांपर्यंत नाकारलं प्रपोजल; प्रेग्नंट होताच अभिनेत्रीने लग्नाला दिला होकार
  • Indian Railway: रेल्वेची चाकं का नसतात रंगीत? त्यांना का करत नाही Paint? 99 टक्के लोकांना नाही माहिती
  • Nagpur University : नागपूर विद्यापीठात वैज्ञानिक क्रांती, रोग निदान चाचण्यांचा खर्च तब्बल 25 पट कमी होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in