• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरात एक नाही झालं तर दुसरी समस्या निर्माण होतेय? तर घरामध्ये आजच करा ‘हे’ छोटे बदल

June 22, 2026 by admin Leave a Comment


आपण अनेकदा एखादे काम पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण शेवटच्या क्षणी कोणत्या ना कोणत्या कारणांने कामात अडथळा निर्माण होतो. तेव्हा आपल्याला निराशा येते. वास्तुशास्त्रानुसार याचे कारण म्हणजे घरातील एखादा वास्तुदोष असू शकतो. जर तुमच्यासोबत ही असे वारंवार घडत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या घरात आणि सवयींमध्ये काही छोटे बदल करून तुम्ही हे दोष सहजपणे दूर करू शकता. चला याबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हा घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. अशावेळेस दरवाजाच्या आजूबाजूला पसारा, तुटलेल्या वस्तू किंवा निरुपयोगी वस्तू ठेवलेलं असेल तर ते अशुभ मानले जाते. ती जागा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे घरात सकारात्मक वातावरण टिकवून ठेवण्यास मदत होईल.

घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नका

अनेक लोक त्यांच्या घरात खराब भांडी, तुटलेली घड्याळे, तडा गेलेल्या काचेच्या वस्तू किंवा खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू दीर्घकाळ ठेवतात. वास्तूनुसार अशा वस्तूंमुळे नकारात्मकता वाढते असे मानले जाते. त्यामुळे ज्या वस्तू वापरात नाहीत किंवा खराब झाल्या आहेत, त्या घरातून काढून टाकणे सर्वोत्तम मानले जाते.

ईशान्य दिशेकडे विशेष लक्ष द्या

वास्तूशास्त्रानुसार ईशान्य कोपरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिशेत जड वस्तू ठेवणे टाळावे असा सल्ला दिला जातो. या दिशेत पूजास्थान किंवा धार्मिक वस्तू ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह टिकून राहण्यास मदत होते.

सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा किंवा उदबत्ती लावा

धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार, सकाळी आणि संध्याकाळी दिवा किंवा उदबत्ती लावल्याने वातावरण शुद्ध होते. अनेक लोकं पूजेच्या वेळी कापूर किंवा उदबत्तीचाही वापर करतात. यामुळे नकारात्मकता कमी होऊन मनाला शांती मिळते, असा विश्वास आहे.

घरात प्रकाश येऊ द्या

वास्तुशास्त्रानुसार घरात अंधार आणि बंद जागा योग्य मानल्या जात नाही. घरासाठी नैसर्गिक प्रकाश आणि ताजी हवा आवश्यक आहे. त्यामुळे खिडक्या वारंवार उघड्या ठेवा आणि घर हवेशीर ठेवा.

या गोष्टी बेडरूममध्ये ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये अनावश्यक इलेक्ट्रॉनिक वस्तू, तुटलेल्या फोटो फ्रेम्स किंवा खराब झालेल्या वस्तू ठेवणे टाळावे. असे मानले जाते की, यामुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो.

वनस्पती सकारात्मकता देखील वाढवतात

घरात तुळस, मनी प्लांट किंवा इतर हिरवी रोपे लावणे शुभ मानले जाते. वास्तूनुसार हिरवी रोपं घरातील वातावरण सुधारण्यास आणि सकारात्मक ऊर्जा वाढविण्यात मदत करतात. मात्र सुकलेली किंवा कोमेजलेली रोपं घरात ठेवू नयेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव अन् टीम इंडियाचं सेमी फायनलचं समीकरण फिस्कटणार; कसं ते पाहा…
  • BMC : भाजप नगरसेवकाने आक्षेप घेताच अधिकाऱ्याचे थेट निलंबन, नेमकं प्रकरण काय?
  • 21 वर्षे केली सरकारी नोकरी अन् इंडस्ट्रीत ठेवलं पाऊल, बनला सर्वात खतरनाक खलनायक, जो अभिनेत्यापेक्षा घेयचा जास्त मानधन
  • NEET UG Re- Exam : पोटात दुखतंय म्हणून वॉशरुममध्ये गेला अन्…, मुलंच नाही मुलीही कॉपी करण्यात पुढे, विद्यार्थीनीच्या कपड्यांमध्ये काय आढळलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in