• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय

June 22, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. ऑपरेशन टायगरची सुरू असलेली चर्चा आज थांबली आहे, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता ठाकरे गटाकडून खासदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून कारवाईला सुरुवात

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत माहिती मिळताच उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष तर काही खासदार ऑनलाईन पद्धतीने हजर होते. मात्र त्यानंतर 6 खासदार फुटल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने व्हीप जारी करत बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला या 6 खासदारांनी दांडी मारली होती. त्यामुळे या खासदारांना कारणे दाखवा नाटीस जारी करण्यात आली होती. मात्र एकाही खासदाराने या नोटीशीला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता या खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत पावले उचलली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीतील बैठकीला गैरहजर राहिल्याने कारवाई होणार

सूत्रांच्या माहितीनुसार, आता बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे, याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील बैठकीला गैरहजर राहिल्याने या खासदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्राद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे आता या खासदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे खासदार कोणते?

  • खासदार संजय जाधव – परभणी
  • खासदार नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली
  • खासदार संजय देशमुख – यवतमाळ-वाशिम
  • खासदार ओमराजे निंबाळकर – धाराशिव
  • खासदार भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी
  • खासदार संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई

उद्धव ठाकरेंसोबत असणारे खासदार कोणते?

  • खासदार अरविंद सावंत – मुंबई दक्षिण
  • खासदार अनिल देसाई – मुंबई दक्षिण मध्य
  • खासदार राजाभाऊ वाजे – नाशिक



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कीबोर्डवर फक्त टायपिंग करता? ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे तुमचे काम होईल झटपट
  • Chanakya Niti : या तीन लोकांची मदत कधीच घेऊ नका, येईल पश्चतापाची वेळ
  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in