• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, सर्व..

April 26, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली. वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरचे आयोजन करण्यात आले. याकरिता डोनाल्ड ट्रम्प आपल्या पत्नीसोबत सहभागी झाले होते. ते उपस्थितांना संबोधित करत असतानाच स्फोटाचे आवाज आले. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अजिबात वेळ न घालता डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षा दिली. ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प टेबलखाली लपताना दिसले. यावेळी त्यांची पत्नी घाबरली होती. काही काळ हॉलमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित काढण्याकरिता सुरक्षारक्षकांनी मोठी घेराबंदी केली. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेनंतर सिक्रेटच्या जवानांचे धन्यवाद मानले. त्यांच्यामुळेच मी सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले. कॅबिनेटमधील सर्व सदस्य सुखरूप असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प  यांनी दिली

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, असे हल्ले काही माझ्यासाठी नवीन नाहीत. हल्लेखोराची चाैकशी सुरू आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी हल्लेखोराला जागीच ठार केले. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला, याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. या गोळीबाराच्या घटनेदरम्यानचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, सिक्रेट सर्विस आणि एजन्सीने खूप जास्त चांगले काम केले. त्यांनी लगेचच शाैर्य दाखवले. गोळीबार करणारा पकडला आहे. एजन्सी या प्रकरणात लवकरच निर्णय घेतील. या घटनेमुळे सायंकाळीचे सर्व नियोजन बदलले. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये हॉटेलमधून डोनाल्ड ट्रम्प यांना कसे सुरक्षित बाहेर काढण्यात आले हे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी एजन्सीच्या लोकांनी उपस्थित लोकांना खाली लपण्यास सांगितले. रस्त्यामधून दूर व्हा.. खाली लपा असे आवाज काही व्हिडीओमध्ये ऐकून येत आहेत. मात्र, अमेरिकेत अशाप्रकारचा गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचेही बोलले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राघव चड्ढा यांच्यासह 7 जणांची खासदारकी जाणार? घडामोडींना वेग… ‘आप’ने आखला प्लॅन
  • ‘आज काही शॉट्स फायर देखील होतील, घटनेआधीच व्हाईट हाऊस प्रवक्त्या लेव्हीट यांची भविष्यवाणी चर्चेत!
  • IPL 2026 : या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे कॅप्टन्स आहेत, ते का..एक मोठा प्लेयर हार्दिक पंड्याच्या बाजूने बोलला
  • चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल होताच संजू सॅमसनने मोडला सुरेश रैनाचा विक्रम, काय ते जाणून घ्या
  • रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्तीच्या वादावर विशाल कोटियन म्हणाला, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर..”

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in