• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गुप्त माहिती मिळाली अन् तब्बल 12 वर्षांनी रिलस्टार अडकला; ठाण्यात त्या रात्री काय घडलं?

May 2, 2026 by admin Leave a Comment


काही गुन्हे पोलीस फाईल्समध्ये गाडले जातात, पण ते कधीच संपत नाहीत. ठाणे गुन्हे शाखेने अशाच एका १२ वर्षे जुन्या प्रकरणाचा छडा लावून गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर चमकदार रिल्स बनवून प्रसिद्धीच्या झोतात असलेला सुरेंद्र पांडुरंग पाटील हा प्रत्यक्षात एक गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले आहे. जमिनीच्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात फेकून देणाऱ्या या रील स्टारला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

ही घटना २०१४ मधील आहे. डोंबिवलीच्या दावडी परिसरात राहणारा २३ वर्षीय तरुण करण बागुल ४ ऑक्टोबर २०१४ रोजी अचानक बेपत्ता झाला होता. तो घरातून निघाला आणि पुन्हा परतलाच नाही. यानंतर बागुल कुटुंबाने मानपाडा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली होती. मात्र पोलिसांच्या हाती कोणताही सुगावा लागत नव्हता. १२ वर्षे उलटली तरी कुटुंबाला वाटत होते की करण कधीतरी परत येईल. पण अद्याप करण काही परतला नव्हता.

पुरावा नष्ट करण्यासाठी बारवी धरणाचा आसरा

यानंतर काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या हाती एक गुप्त माहिती लागली होती. त्यानंतर या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली. करण बागुल अपहरण प्रकरणी तपासात एक मोठी माहिती समोर आली. हा गुन्हा केवळ अपहरणाचा प्रकार नव्हता. तब्बल ७ एकर जमिनीच्या व्यवहारातून सुरेंद्र पाटील आणि करण बागुल यांच्यात मोठे आर्थिक मतभेद निर्माण झाले होते. या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी करणचे अपहरण केले. त्याला दावडी येथील पाटील याच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. यानंतर संतापाच्या भरात सुरेंद्र पाटीलने कार्यालयातील लोखंडी सळीने करणच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की करणचा जागीच मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सुरेंद्र पाटीलने त्याचे साथीदार चंद्रकांत गायकवाड आणि सुरेश देगावत ऊर्फ छोटू (३२) यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. एका खासगी गाडीत मृतदेह टाकून त्यांनी मुरबाड येथील बारवी धरणाजवळील घनदाट जंगलात तो फेकून दिला. त्यावेळी मुरबाड पोलिसांना एक अज्ञात मृतदेह सापडला होता. परंतु ओळख पटू न शकल्याने ती फाईल बंद करण्यात आली होती. आता १२ वर्षांनंतर डीएनए आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तो मृतदेह करण बागुलचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रील स्टारचा खरा चेहरा समोर

या प्रकरणातील मुख्य आरोपी ५५ वर्षीय सुरेंद्र पांडुरंग पाटील हा सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, या रिल्सच्या पडद्यामागे एक क्रूर मारेकरी लपला होता, हे आता समोर आले आहे. हे प्रकरण जुने असले तरी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आम्ही आरोपींपर्यंत पोहोचलो. गुन्ह्यात वापरलेली लोखंडी सळी जप्त करण्यात आली असून, न्यायालयाने आरोपींना २ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असे ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी अमर सिंग जाधव यांनी सांगितले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • HSC Board Result 2026: परीक्षा क्रमांक टाकूनही निकाल नाही दिसला? घाबरू नका, इयत्ता 12वीचा Result कधी दिसणार? एका क्लिकवर जाणून घ्या
  • दुसऱ्याची कथा चोरून बनवला चित्रपट, ठरला ब्लॉकबस्टर, अभिनेत्री बनली नॅशनल क्रश, पाहण्यासाठी थिएटरबाहेर लागायच्या रांगा
  • Maharashtra HSC 12th Result 2026 | इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल या विभागाचा?
  • Maharashtra Board 12th Result 2026: यंदाचा निकाल पाहून अवाक व्हाल! पुन्हा मारली मुलींनी बाजी, फक्त एका क्लिकवर सगळी डिटेल्स
  • पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ्या घटना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in