• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गुणरत्न सदावर्तेंना दणका; अखेर गुन्हा दाखल, जरांगे पाटलांबद्दलच ते वक्तव्य भोवलं

August 23, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर येत आहे, ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास घुले हत्याप्रकरणाच्या संदर्भात बीडमध्ये शनिवारी विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भाषणादरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. तसेच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपल्या भाषणातून धमकीवजा इशारा दिल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे, आता या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगधर काळकुटे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?   

विलास घुले हत्याप्रकरणाच्या संदर्भात बीडमध्ये शनिवारी विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भाषणादरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून, त्यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या फिर्यादीवरून गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका 

दरम्यान या मोर्चामध्ये बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून व्हायरस पसरवण्याचे काम सुरू आहे. यांना ओबीसी नेता महसूलमंत्री म्हणून नको आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा वारंवार अपमान केला जात आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा किती रोल आहे, हे माहिती नाही. परंतु जर आता मनोज जरांगे यांनी यापुढे चंद्रशेखर बावनकुळे यांचा अपमान केला तर आम्ही देखील एकनाथ शिंदे यांचा अपमान करू, असा इशाराही यावेळी सदावर्ते यांनी केला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in