
Shambhuraj Desai Big Statements: ठाकरे सेनेला गेल्या महिन्यात मोठा झटका बसला. सहा खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून ऑपरेशन टायगर अजून संपलेले नसून 14 आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑपरेशन टायगर 3.0 लवकरच राबवण्यात येणार असून आमदार फोडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्यांनी मोठे संकेत दिले आहेत. मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव सेनेवर टीका करताना मोठे संकेत दिले आहेत.
खासदार गेले, आता आमदार…
उद्धव ठाकरे सेनेचे (युबीटी) खासदार गेले आहेत आता आमदार जाण्याच्या मार्गावरती आहेत, असा मोठा दावा मंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे. त्यांना सुद्धा आता सारखं सारखं बोलवून म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारे संशयाने बघितल्या सारखं त्याचे नेते करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली. त्यावर निशाणा साधताना अशा बैठका 2022 पूर्वी जर घेतली असत्या तर आज अशी अवस्था झाली असती का? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते शिंदे यांना मिंधे म्हणत आहेत. पण शिंदे यांनी त्यांच्या कशा चिंध्या चिंध्या केल्या आहेत, हे सर्वच पाहत असल्याचा टोला त्यांनी लगावला. आता उशिरा या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली आहे. उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असा टोला त्यांनी लगावला. उबाठाच्या पायाखालची जमीन सरकल्यानेच अशा बैठका होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
उद्धव सेनेला जनाधार उरला नाही. 2022 ला आम्ही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भूमिका स्वीकारली. लगेच यांनी सुरू केलं माझा पक्ष चोरला, माझे वडील चोरले माझे हे चोरलं, असे सुरू केले. 2024 ला आम्ही जर चोरलेला पक्ष असता तर लोकांनी त्या पक्षावरती शिक्कामोर्तब करून आमचे 60 आमदार निवडून दिले असते का, असा सवाल त्यांनी केला. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बाजूने जनाधार असल्याचा दावा देसाई यांनी केला. हे सत्य स्वीकारा असा सल्लाही त्यांनी दिला. प्रामाणिकपणे सकाळी नऊच्या त्यांचा भोगा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत उबाठाची अशीच पडझड होत राहणार आहे. किती त्यांनी बैठका घेतल्या तरी त्या बैठकांचा शून्य परिणाम होईल, असा टोला त्यांनी लगावला.
डोंबिवली डॉक्टर मारहाण
त्याही शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विशेषता वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने मारहाण करणे योग्य नाही. आमच्या नगरसेवकांना निश्चितपणे याबाबतीत उचित समज पक्षाचे नेतृत्वाकडून दिली जाईल. निश्चितपणे अशा पद्धतीचं कोणी समर्थन या कृतीच करणार नाही. कुठल्याही पक्षाचा कोणी नगरसेवक जरी असला तरी कडक शब्दात त्यांना या पद्धतीची समज आमच्या पक्षाचे नेतृत्वाकडे दिली जाईल, असे मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.
ऑपरेशन तुतारी
ऑपरेशन कुठलेही सांगून केलं जात नाही. त्यामुळे ऑपरेशन मध्ये जे डॉक्टर असतात सर्जरी करणारे ऑपरेशन करणारे यालाच फक्त माहिती असते की आपण ऑपरेशन करणार आहोत ते. त्यामुळे असे ऑपरेशन सांगून होत नाहीत, असे सूचक वक्तव्य देसाई यांनी केले. आपण आता पाहिलं याच्यापूर्वी ऑपरेशन झालेली कळाली नाहीत. अगदी परवा दिवशी सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान विधिमंडळात सुद्धा अशा पद्धतीचा एक प्रसंग घडला. त्याची कल्पना सकाळपर्यंत कुणाल नव्हती. त्यामुळे ही ऑपरेशनची प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे, असा मोठा दावा सुद्धा मंत्री शंभुराज देसाई यांनी केला.
डान्सबार बंदी कायदा
आर. आर. आबा गृहमंत्री असताना आम्ही सुद्धा त्यावेळी सभागृहामध्ये आमदार होतो. त्यावेळी आपण डान्सबार विरोधी कायदा कडक केला कडक नियमावली केली पण लाईव्ह परफॉर्मन्स ऑर्केस्ट्रा झाला जी परवानगी मिळायची या एका पळवाट सोडून अशा पद्धतीने काही डान्सबार चालले जायचे. पण आता लाईव्ह परफॉर्मन्स ऑर्केस्ट्रा जे आहेत त्याचे सुद्धा नियम त्या पळवाट सुद्धा ह्या अशा डान्सबार वाल्याला सापडणार नाहीत, अशा पद्धतीची दुरुस्ती आपण कायद्यामध्ये केली असल्याचे त्यांनी सांगितले. निश्चितपणे पूर्णपणे राज्यामध्ये डान्सबार शंभर टक्के बंदी असेल असा दावा देसाई यांनी केला.
Leave a Reply