• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खासदाराच्या मुलाने कारखाली मुलीला चिरडले, भरधाव वेगाने गेला जीव, थेट..

August 21, 2026 by admin Leave a Comment


हैद्राबादमध्ये अतिवेगामुळे मोठा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ‘ॲस्टन मार्टिन’ कारने एका 26 वर्षीय मुलीला जोरदार धडक दिली. या मुलीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात राज्यसभा खासदाराच्या लेकावर गुन्हा दाखल झाला. निष्काळजीपणे आणि अतिवेगाने तो गाडी चालवत होता, असा आरोप आहे. मॉलमध्ये काम करणारी मुलगी दुपारच्या जेवणासाठी बाहेर आली असताना अतिवेगाने आलेल्या ॲस्टन मार्टिन कारने तिला धडक दिली. या प्रकरणात राज्यसभा खासदार लिंगमनेनी रमेश यांचा 21 वर्षीय मुलगा लिंगमनेनी संजुश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 ऑगस्ट रोजी माधापूर भागातील इनऑर्बिट मॉलजवळ रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. इतक्या वेगाने कार आली की, ती तरुणी स्वत: वाचू शकली नाही.

मृत तरुणी भारती मुखी ही मॉलमध्ये असलेल्या कपड्यांच्या शोरूममध्ये कामाला होती. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भारती आणि तिची सहकारी पूजा अलोणे या दोघी दुपारी 3 वाजता जेवणासाठी जवळच असलेल्या आयटीसी कोहिनूरच्या भागात गेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर दोघी मॉलच्या दिशेने निघाल्या. यादरम्यान रस्ता ओलांडताना भारतीला कारने धडक दिली.

गाडीने धडक दिल्यानंतर भारतीच्या डोक्याल गंभीर दुखापत झाली. त्यानंतर खूप जास्त रक्तस्राव झाला. या अपघातानंतर तिला तात्काळ जुबली हिल्स येथील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे दाखल करताच तिला मृत घोषित केले. ज्या गाडीने तिला उडवले, त्याच गाडीत टाकून तिला रूग्णालयात नेण्यात आले. भारतीची मैत्रीण पूजाने स्टोअर मॅनेजरला माहिती दिली.

VIDEO | Hyderabad: Son of Andhra Pradesh Rajya Sabha MP Lingamaneni Ramesh has been booked after a luxury Aston Martin car allegedly hit and killed a 26-year-old woman in Madhapur. Further investigations underway.#HyderabadNews

(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/Hp8UeVTJei

— Press Trust of India (@PTI_News) August 21, 2026

यानंतर स्टोअर मॅनेजर अश्विन कुमार यांनी याची माहिती पोलिसांना दिली. संजुश हाच कार चालवत होता. संजुशचे वडील एक प्रतिष्ठित व्यावसायिक आणि आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जन सेना पक्षाचे ते खासदार आहेत. एसीपी पी. श्रीधर यांनी सांगितले की, आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे. या गुन्ह्यासाठीची कमाल शिक्षा सात वर्षांपेक्षा कमी आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने आरोपीला अटक करण्यात आली नाही.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in