• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खवड्या डोंगर प्रकरणात हादरवून टाकणारा ट्विस्ट, कुणालच्या मृत्यूचं खळबळजनक खरं कारण समोर; आई-वडिलांमध्ये…

August 22, 2026 by admin Leave a Comment


ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील कुणाल चांदवडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यू प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आयफोन खरेदी करण्याच्या हट्टापोटी हा प्रकार घडला, अशी चर्चा होती. मात्र आता कुणालच्या मावस काकांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. आता कुणाल आणि त्याच्या आई वडिलांच्या आत्महत्येचे खरे कारण समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आयफोनमुळे नव्हे तर…

समोर आलेल्या माहितीनुसार, कुणालच्या आई-वडिलांमध्ये घरगुती कारणातून छोटा-मोठा वाद होता. आई-वडिलांनी भांडू नये, त्यांना भीती दाखवून वाद थांबवावा, या उद्देशाने कुणाल डोंगरावर गेला होता, अशी माहिती त्याच्या मावस काकांनी TV9 मराठीशी बोलताना दिली. कुणालला हे टोकाचं पाऊल उचलायचं नव्हतं. वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी तोल गेल्याने ही दुर्दैवी घटना घडली, असा दावा मावस काकांनी केला आहे.

कुणाल अभ्यासात हुशार होता….

कुणाल अभ्यासात हुशार होता. दहावीमध्ये त्याने 95 टक्के गुण मिळवले होते आणि तो NEE Tची तयारी करत होता. त्यामुळे आयफोनच्या हप्त्यांमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा चुकीची असल्याचं मावस काकांनी स्पष्ट केलं आहे. कुणाल हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याच्यावर आई-वडिलांचा खूप जीव होता. आता या घटनेनंतर घरातील पाळीव श्वानही एकटा पडला आहे. आयफोन की आई-वडिलांचं भांडण? या चर्चेला आता कुणालच्या मावस काकांच्या दाव्यामुळे वेगळं वळण मिळालं आहे.

आई-वडिलांत काय वाद होता?

कुणालच्या मावस काकांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘मोठं काही कारण नव्हतं. छोटे-मोठे वाद होते, घरातले कारण आणि त्याचं बोलणं टोचायचं. बाहेर वाद नव्हता, घरातल्या घरात वाद होता. मात्र त्यांच्या मुलाला वाटायचं वाद नको व्हायला. वडील पण त्याच्यावर थोडे रागावले होते. शाळेमध्ये तो खूप हुशार होता. भीती दाखवण्याच्या नादात हे झालं. त्याला पण करायचं नव्हतं, मात्र पकडण्याच्या नादात घटना घडली.

कुणालला आयफोन पाहिजे होता का?

कुणालला आयफोन पाहिजे होता का? यावर बोलताना काकांनी सांगितले की, त्यांचे बॅकग्राऊंड चांगले आहे. शेती वगैरे भरपूर आहे. नीटसाठीसुद्धा तीन लाख रुपये भरले आहेत. त्यांच्या घरी कुत्रा आहे. त्याचा सुद्धा महिन्याला सात ते आठ हजार रुपये खर्च आहे. एक मेसेज व्हायरल झाला. त्यांच्याकडे दोन आयफोन आहेत. ऑलरेडी त्याच्याकडे आयफोन होता. ते पंचनाम्यातसुद्धा आलं आहे. तसलं काही नाही. घरगुती वाद असल्यामुळे चुकून झालेला विषय आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in