• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खवड्या डोंगराहून उडी मारणाऱ्या कुणालच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ पुढे, आयफोन नाहीच..

August 23, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजीनगरमधील देवळाली परिसरात दुर्देवी घटना घडली. खवड्या डोंगराहून मुलगा, आई वडिलांचा पडून मृत्यू झाला. मुलगा डोंगरावर पोहोचला. याबाबत माहिती मिळताच आई आणि वडिलांनी थेट डोंगराकडून धाव घेतली. आईने लेकाची समजूत काढली. तिने मंगळसूत्रही काढून फेकले. मात्र, 19 वर्षीय मुलगा कोणाचेही काहीही ऐकण्यात तयार नव्हता. उपस्थित लोकही त्याला समजून सांगत होते. पण तो ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी वडिलांनी त्याला पकडले. मात्र, यादरम्यान वडील आणि मुलगा डोंगराहून खाली कोसळले. हे पाहून आईने देखील उडी मारली. तिघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, मुलाला आयफोन पाहिजे होता, ज्यामुळेच तो डोंगरावर पोहोचला होता. मात्र, आता अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. कुटुंबात काहीतरी वाद असल्याचे सांगितले जातंय.

कुणाल चांदगुडे वय 19 असे खवड्या डोंगराहून उडी घेणाऱ्या मुलाचे नाव आहे. त्याच्यासोबतच मुरलीधर चांदगुडे वडील आणि आई संगीता चांदगुडे यांंनीही लेकासोबत डोंगराहून उडी घेतली. आता याबाबत मोठे खुलासे होत आहे. त्यातच कुणालच्या आईचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुणालची आई काही गंभीर आरोप करताना दिसत आहे.

एका व्हिडीओमध्ये कुणालची आई संगीता म्हणतात की, माझ्या मुलाचे खाऊन म्हातारपणाला तू बदाम खाणार नाहीस… मेडिसिनच खाशील… जेव्हा खाशील ना, तेव्हा तुला रडायलाही माणूस भेटणार नाहीत. कुणालची आई हे सर्व तळतळाटाने बोलताना दिसतंय. कर्म येतील नक्कीच तुझ्याकडं, लवकरच येतील. माझा हा शब्द आहे, एका आईचा शब्दय असं त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by sangita_patil-30 (@official_sangita_patil_30)

यासोबतच दुसऱ्या एका व्हिडीओत संगीता या म्हणताना दिसल्या की, जी बायको तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत होती. तुमच्या आजारपणात दवाखान्यात चकरा मारत होती. ती बायको आता वाईट आणि तुमच्या बहिणी तुमच्या मयतीलाही येणार नाही. कदाचित यालाच रक्त म्हणतात… संगीत यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की, त्यांच्या कुटुंबात मोठा वाद होता.

 





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in