• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खवड्या डोंगरावरुन उडी खाणाऱ्या कुणालच्या प्रकरणात थरारक वळण, आजीनेच केली पोलखोल, माझ्या..

August 23, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर एक दुर्देवी घटना घडली. या घटनेने काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले. एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. कुणाल चांदगुडे याला आयफोन असल्याने त्याने हट्ट धरला आणि त्यावरून वडिलांसोबत त्याचा वाद झाल्याचे सांगितले गेले. पण त्यानंतर कुणालच्या मावशीच्या पतीने खुलासा केला की, कुणाल याच्याजवळ दोन आयफोन अगोदरच होते. मुलगा कुणाल हा खवड्या डोंगरावर गेला. त्यानंतर तिथे आई पोहोचली, आई त्याला गयावया करत होती. पण कुणाल हा कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. 3 तास त्याला समजावले जात होते. यादरमयानच मोठी गर्दी झाली. गर्दीतील लोकही त्याला समजावून सांगत होते. शेवटी वडील मुरलीधर चांदगुडे त्याला पकडण्यासाठी पुढे आले. मात्र, दोघेही खाली कोसळले. हे पाहून आईनेही उडी घेतली. या प्रकरणातील अनेक व्हिडीओ पुढे आले. सर्व घटना व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये दिसतंय.

त्यातच आता मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबियांकडून धक्कादायक खुलासे केले जात आहेत. tv9 मराठीचे पत्रकार मुरलीधर चांदगुडे यांच्या मुळगावी अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव येथे पोहोचले. यावेळी त्यांनी कुटुंबियांसोबत संवाद साधला. यादरम्यान कुटुंबियांनी काही धक्कादायक खुलासे केले. 20 वर्षापूर्वी त्याने आम्हाला न सांगता संगीतासोबत लग्न केले होते.

तो आम्हाला जास्त बोलत नव्हता. पण गेल्या 4 महिन्यांपासून तो आमच्या संपर्कात होता. यादरम्यान मुरलीधर चांदगुडे यांच्या आई यांना प्रश्न विचारला असता लेकाच्या जाण्याने त्यांना इतके दु:ख झाले की, काय बोलावे हेच त्यांना कळत नव्हते. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबवण्याचे नाव घेत नाहीत. त्यांनी म्हटले की, 15 दिवसापूर्वी तो आलेला घरी.

तो जास्त बोलत नव्हता. त्याची बायको आम्हाला त्याला बोलू द्यायची नाही. तिने कधी बोलू दिले नाही. तिने त्याला दूर केले. हे सर्व बोलताना आई रडत होती. लेकाच्या जाण्याने मोठे दु:ख कुटुंबावर कोसळले. चांदगुडे कुटुंबात मोठा वाद होता, हे यावरून स्पष्ट होतंय. गेल्या कित्येक वर्षांपासून संगीता आणि चांदगुडे यांच्यात संवादही नव्हता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in