• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, श्रीलंका दौऱ्यात ज्युनिअर टीम इंडिया खेळणार 5 सामने, पाहा वेळापत्रक

June 11, 2026 by admin Leave a Comment


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता टीम इंडियाचं भविष्य घडवण्यासाठी युवा संघावर लक्ष केंद्रीत करून आहे. ज्युनियर क्रिकेट निवड समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी अंडर 19 संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा दौरा 4 जुलैपासून सुरू होणार आहे. 4 जुलै त 23 जुलै दरम्यानचं वेळापत्रक समोर आलं आहे. वनडे मालिका स्पर्धा हंबनटोटामध्ये होणार असून त्यात तीन वनडे खेळले जाणार आहेत. पहिला वनडे सामना 4 जुलै, दुसरा वनडे सामना 6 जुलै आणि तिसरा वनडे सामना 9 जुलै रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार वनडे सामना सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर दोन मल्टी डे सामने खेळले जाणार आहेत. पहिला मल्टी डे सामना 13 जुलै ते 16 जुलै दरम्यान होणार आहे. हा सामना गालेमध्ये होणार आहे. त्यानंतर दुसरा मल्टी डे सामना 20 जुलै ते 23 जुलै दरम्यान कोलोंबोत होणार आहे.

दोन्ही संघांचा कर्णधार म्हणून मध्य प्रदेशच्या यशबर्धन सिंह चौहानकडे जबाबदारी असणार आहे. तर लक्ष्य रायचंदानी याच्याकडे उपकर्णधारपद असेल. वनडे संघात भारताचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा लहान मुलगा अन्वय द्रविडचा समावेश आहे. अनवयला 15 सदस्यीय संघात विकेटकीपर फलंदाज म्हणून स्थान मिळालं आहे. अन्वयने देशांतर्गत कुमार गटातील स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. विनू मांकड ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या 19 वर्षांखालील संघाचे कर्णधारपद भूषवून अन्वय द्रविड चर्चेत आला. त्यामुळे निवडकर्त्यांचं लक्ष त्याच्याकडे होतं. मल्टी डे संघात मात्र त्याची निवड झालेली नाही.

वनडे संघात रजत बघेल आणि अन्वय द्रविड यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर बहुदिवसीय सामन्यांसाठी मानव कृष्णा आणि आर्यन संदेश सकपाल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळतील. आता अन्वयला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारताच्या अंडर 19 संघाचा श्रीलंका दौरा वेळापत्रक

  • 4 जुलै, 2026 – पहिली एकदिवसीय स्पर्धा, हंबनटोटा
  • 6 जुलै, 2026 – दुसरी एकदिवसीय स्पर्धा, हंबनटोटा
  • 9 जुलै, 2026 – तिसरी एकदिवसीय स्पर्धा, हंबनटोटा
  • 13-16 जुलै, 2026 – पहिला बहुदिवसीय सामना, गॉल
  • 20-23 जुलै, 2026 – दुसरा बहुदिवसीय सामना, कोलंबो



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in