• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘कोणाचा कान फुटला, तर कोणाचा खांदा सरकला…,’ प्रवाशांच्या किंचाळ्या आणि आरोळ्या, एअर इंडियाच्या विमानात भयानक टर्ब्युलन्स

August 4, 2026 by admin Leave a Comment


एअर इंडियाच्या थायलंडवरुन दिल्लीला येणाऱ्या विमानाला खतरनाक टर्ब्युलन्सचा सामना करावा लागल्याने १२ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहे. हे विमान फुकेतहून दिल्लीला येत असताना मधल्या मार्गात विमान टर्ब्युलन्समध्ये अडकले. हे टर्ब्युलन्स इतके भयानक होते की अनेक प्रवाशांच्या मानेला जखमा झाल्या तर काही जणांच्या कानातून रक्त येऊ लागले. विमानाच्या छताला देखील मोठे नुकसान झाले आहे. जखमी विमान प्रवाशांवर उपचार केले जात आहे.

माझा भाऊ एअर इंडियाच्या फुकेत ते दिल्ली विमानात होता. फ्लाईट क्रमांक AI2379 उंचीवर असताना अचानक टर्ब्युलन्सचा सामना करावा लागल्याचे एका प्रवाशाच्या भावाने सांगितले.जास्त प्रेशरमुळे विमान वेगाने खाली झेपावले, फ्लाईटच्या आत निर्माण झालेल्या प्रेशरमुळे प्रवाशांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. जास्त दबावामुळे त्यांच्या कानाच्या पडद्यांना इजा झाली. वेगाने विमान खाली आल्याने विमानातील वस्तूंवर आदळून अनेकांची हाडे मोडली आहेत.

एका प्रवाशाच्या खांद्याला जोरदार दुखापत झाली आहे. एअरलाईनने सांगितले की काही प्रवाशांच्या आणि चालक दलाच्या सदस्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.दक्षता म्हणून त्यांची वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना एअर पोर्टजवळी मेडिकल सुविधा केंद्रात पाठवले आहे.येथे एअर इंडियाची एअरपोर्ट टीम आणि मेडिकल स्टाफ त्यांची मदत करत आहेत.

प्रवाशांनी सांगितले की दिल्लीत लँडींगच्या आधी विमान अचानक खाली येऊ लागले. आणि जोरदार हिंदळू लागले. यामुळे प्रवाशांनी एकच गलका केला. यादरम्यान अनेक प्रवासी जखमी झाले. काही वेळासाठी विमानात अफरातफर माजली. मात्र, पायलटने काही वेळात विमानाला सुखरुपपणे लँड केले.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की प्रवासी आणि चालक दलाची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी हीच आमची प्राथमिकता आहे. या घटनेत प्रभावित झालेल्या प्रवाशांना शक्य ती मदत पुरविली जात आहे. आणि या घटनेच्या चौकशी संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केले जात आहे.

येथे पाहा पोस्ट –

#Breaking – An Air India plane sways violently, throwing passengers without seat belts into the air! Horrifying turbulence on the Phuket-Delhi Air India flight. pic.twitter.com/PHnnaYgbEQ

— NEWS WALA (@NEWSWALApy) August 4, 2026

एअर टर्ब्युलन्स का होते ?

आकाशात एअर टर्ब्युलन्स तेव्हाच निर्माण होते जेव्हा हवेचा प्रवाह असमान आणि अनियमित होतो. सामान्यत : हवा स्थित पातळीत वाहाते. परंतू काही कारणांनी हवेत गडबड निर्माण होते. पृथ्वी तापल्याने हवा गरम वरच्या दिशेने जाते आणि थंड हवा खाली जातो. ज्यामुळे थर्मल डिस्टरबन्स बनते.हवेची पर्वताला टक्कर झाल्याने हवा वरती आणि खाली वाहते. उंचीवर जेट स्ट्रीम सारखी वेगवान हवा पसरल्याने वेगातील फरकाने अशांतता निर्माण होते.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
  • Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
  • Chanakya Niti : आयुष्यात या तीन चुका कधीच करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
  • घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in