• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोणताही कपडा 16 रुपयात 16 मिनिटांसाठी ऑफर, कानपूर मध्ये तुफान घडलं..

August 18, 2026 by admin Leave a Comment


सेल वाढवण्यासाठी अनेकदा कंपनी किंवा दुकानदाराकडून डिस्काऊंट ऑफर दिली जाते. खासकरुन सणवाराच्या काळात किंवा ठराविक दिवशी अशा डिस्काऊंट ऑफर दिल्या जातात. डिस्काऊंट ऑफर म्हटलं की, दुकान असो किंवा मॉल ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. कानपूरच्या अनवरगंज भागातील आलम मार्केट मध्ये 15 ऑगस्टच्या रात्री हेच घडलं. आलम मार्केट मधील एका कपड्याच्या दुकानात 16 रुपयात कोणताही कपडा विकत घ्या अशी ऑफर देण्यात आली होती. 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर 16 मिनिटांसाठी ही ऑफर होती. पहिल्या 16 मिनिटात कोणताही कपडा 16 रुपयात विकत मिळणार अशी ती ऑफर होती. आलम मार्केटचे मालक रईस आलम यांनी ही स्पेशल बर्थ डे ऑफर दिली होती. सोशल मीडियावरुन त्यांनी जाहीरात केली. या ऑफरमुळे मध्यरात्रीच्या सुमारास आलम मार्केट मध्ये प्रचंड गर्दी उसळली. चेंगराचेंगरी सारखी स्थिती झालेली.

इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही जाहीरात वेगान पसरली. 15 ऑगस्टच्या रात्री 11 च्या सुमारास दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. हजारो लोक जमल्याने आपसूकच रस्ता बंद झाला. ट्रॅफिक जॅम झालं. परिस्थिती हाताळणं कठीण बनलं. गर्दी वाढल्यानंतर जास्त लोकांनी आत येऊ नये म्हणून दुकान बंद करण्यात आलं. 16 रुपयांच्या ऑफरनुसार कपडे द्या अशी मागणी ग्राहकांनी केल्यानंतर तणाव वाढला. पोलीस तक्रारीनुसार, दुकानातील कर्मचारी आणि जमलेल्या गर्दीत शाब्दीक वादावादी सुरु झाली.

घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

परिस्थिती हाताबाहेर जात गोंधळ वाढला. लोक धक्काबुक्की करत होते, पळापळ सुरु होती, अनेक लोक खाली पडून जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अनवरगंज आणि आसपासच्या पोलीस स्टेशनमधून कुमक मागवण्यात आली. पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. अनवरगंजचे ACP मनजय सिंह म्हणाले की, ‘सोशल मीडियावरील 16 रुपयात कपडे या जाहीरातीमुळे गर्दी जमली होती’

मोहम्मद आलम, रईस आलम आणि सलमान आलम या दुकानाच्या संचालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने तक्रार नोंदवली. लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in