• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केसांच्या वाढीसाठी ‘हा’ घरगुती हेअर स्प्रे वापरलात तर बाजारात मिळणाऱ्या महागड्या स्प्रेलाही विसराल

May 2, 2026 by admin Leave a Comment


आजकाल केसांच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. केस गळणे आणि कोंडा ही आपल्या सर्वांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. प्रदूषण आणि अयोग्य आहारामुळे केस अकाली पांढरे होत आहेत आणि केसांची वाढ खुंटत आहे. आपल्यापैकी बहुतेक जण महागडे हेअर स्प्रे आणि टॉनिक विकत घेऊन केसांचे उपचार करून घेतात. पण त्याचे परिणाम अनेकदा व्यर्थ ठरतात. तुम्हाला माहित आहे का की तुमच्या घराच्या आसपासत बाल्कनीतील काही अशी झाडं आहेत जे तुमच्या केसांच्या सर्व समस्या सोडवू शकतात. कडुलिंब, जास्वंद आणि कढीपत्ता हे असे तीन घटक आहेत जे तुमच्या केसांसाठी जादुई उपायांपेक्षा कमी नाहीत. चला तर मग हा हेअर स्प्रे कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

हेअर स्प्रे करिता या तीन गोष्टी आहेत विशेष

कडुलिंब – कडुलिंबामध्ये जीवाणूनाशक गुणधर्म असतात. जर तुम्हाला डोक्याला खाज सुटत असेल किंवा कोंडा असेल तर कडुलिंब ते पूर्णपणे नाहीसे करण्यास मदत करू शकते.

जास्वंद – जास्वंदाची फुले आणि पाने व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात. त्यामुळे केस गळणे थांबण्यास आणि केसांना चमकदार बनविण्यात मदत होऊ शकते.

कढीपत्ता: कढीपत्त्यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने असतात, जे केसांची मुळे मजबूत करतात आणि अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध करतात.

हेअर स्प्रे कसा बनवायचा?

साहित्य

कडुलिंबाची पाने

कढीपत्ता

जास्वंदीची फुले

पाणी

स्प्रे बाटली

पद्धत-

सर्वप्रथम कडुलिंब, जास्वंद आणि कढीपत्ता स्वच्छ पाण्याने चांगले धुवा, जेणेकरून त्यावर साचलेली धूळ निघून जाईल.
नंतर एका पातेल्यात एक ग्लास पाणी गरम करा. पाणी उकळू लागल्यावर त्यात कडुलिंब, जास्वंद आणि कढीपत्ता टाका.

आता पाणी निम्मे होईपर्यंत आणि त्याचा रंग गडद हिरवा किंवा फिकट लाल (जास्वंदीमुळे) होईपर्यंत ते उकळवा.

आता गॅस बंद करा आणि हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.

तुमचा घरगुती केस वाढवणारा स्प्रे तयार आहे.

याचा वापर कसा करावा?

हा स्प्रे वापरायला खूप सोपा आहे. झोपण्यापूर्वी किंवा केस धुण्याच्या 2 तास आधी तो तुमच्या स्कॅल्पवर भरपूर प्रमाणात स्प्रे करा. तसेच या स्प्रेमधील घटक केसांच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी 5 मिनिटे हळुवारपणे मालिश करा. त्यानंतर तुम्ही पाण्याने केस धुवून काढू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?
  • Rupali chakankar | चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे… रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in