• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केवळ लठ्ठ लोकांनाच होतो फॅटी लिव्हर ?,विविध गैरसमजांवर डॉक्टरांचे मत काय? जाणून घ्या

March 6, 2026 by admin Leave a Comment


आजकाल फॅटी लिव्हरची समस्या खूप वाढली आहे. आहाराच्या चुकीच्या सवयी हे देखील एक मोठे कारण यासाठी असते. अनेक लोक फॅटी लिव्हरला एक सर्वसामान्य समस्या मानतात आणि या संदर्भात काही मिथक देखील आहेत. या मिथकांसंदर्भात सफदरजंग हॉस्पिटलचे सिनियर रेसिडेंट डॉ. दीपक सुमन यांच्या केलेली बातचीत पाहा…

मिथक 1: फॅटी लिव्हर केवळ दारु पिणाऱ्यांना होतो ? – अनेक लोकांना वाटते फॅटी लिव्हर केवळ दारु पिणाऱ्यांना होतो. परंतू यात काही तथ्य नाही. आता कोणी दारु पिणारा नसला तरी देखील त्याला फॅटी लिव्हर होऊ शकतो. यास नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर (NAFLD) म्हणतात. चुकीचा आहार, इन्सुलिन रेजिस्टेंस आणि वाढता लठ्ठपणा यामुळे देखील फॅटी लिव्हर होऊ शकतो असे डॉ. सुमन यांनी म्हटले आहे.

मिथक 2: केवळ लठ्ठ लोकांना फॅटी लिव्हर होतो ?- अनेकांना वाटते की फॅटी लिव्हर हा आजार केवळ लठ्ठ लोकांना होतो. परंतू आता अनेक बारीक अंगकाठीच्या लोकांनाही फॅटी लिव्हर झाल्याचे उघड झाले आहे. यास लीन NAFLD असे म्हटले जाते. मग भले तुम्ही बाहेरुन बारीक दिसत असाल, परंतू आत जमणारा विसरल फॅट देखील या आजारास कारणीभूत ठरु शकतो.

मिथक 3: लिव्हर ब्लड टेस्ट नॉर्मल असेल तर चिंतेची गरज नाही. – लिव्हरच्या टेस्टसाठी लोक SGPT टेस्ट करतात. या टेस्टचा रिपोर्ट नॉर्मल आला तर लिव्हर ठीक आहे असे नव्हे. अनेकदा सुरुवातीच्या स्टेजमध्ये लिव्हर एंजाईम (ALT, AST) सामान्य असतात. परंतू लिव्हरमध्ये फॅट जमायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे केवळ ब्लड टेस्टवर अवलंबून राहणे योग्य नाही.

मिथक 4: फॅटी लिव्हर पासून धोका नाही तो नेहमी बरा होतो ? मात्र, फॅटी लिव्हर ग्रेड 1 असेल तर सुरुवातीच्या टप्प्यावर यास नियंत्रित आणता येते. परंतू नंतर बराच काळ दुर्लक्ष केले तर हा आजार वाढतो. ग्रेड वाढल्यानंतर फायब्रोसिस आणि सिरोसिसमध्ये याचे परिवर्तन होऊ शकते. जे खूपच धोकादायक आहे.

लिव्हरच्या आरोग्यासाठी आहाराची काळजी घ्यावी, मैद्याचे पदार्थ कमी खावेत. रोज व्यायाम करावा. मद्यपान करु नये. दरवर्षी लिव्हरची तपासणी करावी.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pahalgam Terror Attack: या दोन काश्मिरींनी गद्दारी केली, नाहीतर पहलगाम घडलंच नसतं, आता हे दोघे कुठे आहेत?
  • इरफान खानचा 16-17 मिनिटांचा चित्रपट, YouTube वर लाखो व्ह्यूज; दिसला क्राइमच्या विश्वाचा खतरनाक चेहरा
  • Pahalgam Attack : अवघ्या 3 हजार रुपयांमुळे गेला 26 लोकांचा जीव ! त्या 2 लोकांमुळे टळलं असतं पहलगामचं रक्तरंजित हत्याकांड, पण ..
  • पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले शहीदांसाठी तीच खरी श्रद्धांजली…
  • Ashok Kharat | ज्याची भीती तेच… लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं… आता प्रकृती कशी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in