• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!

June 19, 2026 by admin Leave a Comment


शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, तर दुसरीकडे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा कार्यक्रम पार पडला.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याची चर्चा जोरात आहे. हे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, त्यांच्या प्रवेशाबाबत आजच्या कार्यक्रमात काही मोठी घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घडामोडींवर अप्रत्यक्षपणे सूचक विधान केले. त्यांनी शिवसेनेच्या 60 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत सर्व कार्यकर्ते, नेते, आमदार आणि खासदार हे आपले ऐश्वर्य असल्याचे सांगितले.

शिंदे म्हणाले, “समोर बसलेले माझे शिवसैनिक हे माझी संपत्ती आहेत. बऱ्याच जणांच्या नजरा आमच्याकडे लागल्या आहेत. मी काय बोलणार, कोण येणार, काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पण आज हा वाघ तुमच्यासमोर उभा आहे.”

यावेळी त्यांनी विरोधकांवरही तीव्र शब्दांत टीका केली. “काही लोक रोज भुंकतात, पण वाघ एकटाच येतो आणि शिकार करतो,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केले. तसेच शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. पुढे काय होतंय ते बघा,” असे सूचक विधान करत त्यांनी आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले.

या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य प्रवेशाबाबत तर्कवितर्कांना वेग आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
  • Donald Trump: ट्रम्पची मोठी कारवाई, चार भारतीय कंपन्यांना एका झटक्यात दणका, अचानक असं का केलं?
  • सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
  • भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटनेचं कारण पहिल्यांदाच समोर, गणपतीची मूर्ती का कोसळली? मोठा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in