• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुणाल चांदगुडेच्या नीट क्लासमधून धक्कादायक माहिती, दोन मित्र…कोचिंग सुरू असताना काय करायचा?

August 23, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजीनगर नगरातील कुणाल चांदगुडे याने कौटुंबिक कलहातून खवड्या डोंगराच्या कड्यावरुन स्वत:ला झोकून दिले आणि सोबत त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही मृत्यू झाला आणि नंतर त्याच्या आईने देखील स्वत:ला डोंगरकड्यावरुन झोकून दिले. त्यामुळे आता या प्रकरणात आयफोनचे थकलेले हप्ते ही थिअर मागे पडत आहे. कुणालचे वडीलांशी पटत नव्हते आणि आईसाठी तो वडिलांशी संघर्ष करत होता असेही उघडकीस आले आहे. आता कुणाल याच्या क्लासमधून वेगळीच माहिती उघडकीस आली आहे.

त्याला डॉक्टर व्हायचे होते

खवड्या डोंगरावरुन कुणाल याने उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर आता तीन तास त्याला रोखण्याचा प्रयत्न अगदी गावाच्या सरपंचापासून सर्वजण करत होते. मात्र, कुणालने कुणाचेही ऐकले नाही आणि स्वत:च्या मनाचे केल्याने या त्रिकोणी कुटुंब नष्ट झाले आहे. कुणाल हा अभ्यासात हुशार होता. त्याला दहावी चांगले ९० टक्के मार्क मिळाले होते. कुणालचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्याला डॉक्टर व्हायचे होते. तो त्यासाठी NEET ची तयारी देखील करत होता. त्याने त्यासाठी आकाश फाउंडेशनमध्ये तो कोचिंग घेत होता.

NEET च्या तयारीसाठी कुणालने आकाश फाउंडेशनमध्ये कोचिंग क्लास लावला होता. मात्र, कुणालच्या बोलण्यातून तो कोणत्याही ताण-तणावात होता असे कधी जाणवले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुणाल हा क्लासला अधिक दांड्या मारायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणाल बेंच क्रमांक तीनवर बसायचा क्लासेसमध्ये फक्त कुणालचे दोन मित्र होते असेही उघडकीस आले आहे.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in