• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुणालच्या निधनाची बातमी धडकली अन् मित्रांना जबर धक्का… जवळच्या मित्राने सांगितली कुणालची ती सवय

August 23, 2026 by admin Leave a Comment


ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. कुणालने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी आलेले त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशातच आता कुणालच्या मित्रांनी त्याच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. क्लासमध्ये त्याची वर्तणूक कशी असायची याबाबतही मित्रांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कुणालचे फक्त दोन मित्र होते…

खवड्या डोंगर आत्महत्या प्रकरणातील कुणालच्या कोचिंग क्लासमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कुणाल अभ्यासात हुशार होता, त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. NEET च्या तयारीसाठी आकाश फाउंडेशनमध्ये तो कोचिंग घेत होता. कुणाल बेंच क्रमांक तीनवर बसायचा, तसेच क्लासमध्ये कुणालचे फक्त दोन मित्र होते. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुणाल क्लासला अधिक सुट्ट्या मारायचा अशी माहितीही समोर आली आहे.

आयफोन हे मृत्यूचे कारण नव्हते…

कुणालच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रांना धक्का बसला आहे. त्यांच्या मित्रांनी सांगितले की, तो असं करेल असं वाटलंच नव्हतं, कुणाल अत्यंत संस्कारी आणि चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. कुणाल क्लासला नियमित असायचा, तसेच तो अभ्यासात हुशार आणि चांगले मार्क मिळवणारा विद्यार्थी होता. कुणालने कधीही कोणतीही अडचण किंवा तणाव मित्रांसमोर बोलून दाखवला नाही. आयफोन हे कुणालच्या मृत्यूचं कारण नव्हतं, नेमकं कारण आम्हाला माहिती नाही असं विधान त्याचा मित्र हर्षद गावंडे याने केलं आहे.

कुणालला जीव द्यायचाच नव्हता, पण…

कुणालच्या मावस काकांनी दिलेल्या माहितीनुसार कुणालच्या आई-वडिलांमध्ये घरगुती कारणातून छोटा-मोठा वाद होत होता. आई-वडिलांनी भांडू नये, त्यांना भीती दाखवून वाद थांबवावा, या उद्देशाने कुणाल डोंगरावर गेला होता. कुणाला डोंगरावरून खाली उडी मारायचीच नव्हती असेही आता समोर आले आहे. मात्र वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी तोल गेल्याने तो आणि त्याचे वडील दोघेही डोंगरावरून खाली कोसळले आणि त्यांचा अंत झाला. त्यानंतर कुणालच्या आईनेही डोंगरावरून खाली उडी मारून जीव दिला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in