• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुणालच्या त्या बाइकमध्ये लपलं चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचं गुढ? मित्रांच्या माहितीने सस्पेन्स वाढला, खवड्या डोंगरावर जाण्याआधी…

August 23, 2026 by admin Leave a Comment


ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यू प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. आता कुणालच्या कोचिंग क्लासमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कुणाल अभ्यासात हुशार होता आणि डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी तो NEET परीक्षेची तयारी करत होता. कुणाल आकाश फाउंडेशनमध्ये कोचिंग घेत होता. त्याची कोचिंगची आवश्यक ती संपूर्ण फी देखील भरलेली होती अशी माहिती समोर आली आहे. तसेच कुणाल बाइकवरून क्लासला जात होता, मात्र त्याची बाइक सध्या कुठे आहे याबाबत अद्याप माहिती समजलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

कुणालच्या क्लासमधून मोठी माहिती समोर

समोर आलेल्या माहितीनुसार, कुणाल क्लासमध्ये बेंच क्रमांक तीनवर बसायचा. त्याचे दोन मित्रही याच कोचिंग क्लासमध्ये शिकत होते. मात्र इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुणाल क्लासला अधिक सुट्ट्या मारायचा, अशी माहिती समोर आली आहे. कुणालच्या बोलण्यातून किंवा त्याच्या वागण्यातून कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण किंवा अस्वस्थता जाणवत नव्हती, अशी माहिती त्याच्या काही मित्रांनी दिली आहे.

कुणाल बाइक घेऊन क्लासला जायचा…

समोर आलेल्या माहितीनुसार, कुणाल नेहमी सकाळी साडेआठच्या सुमारास बाइक घेऊन क्लासला यायचा. दुपारी एक वाजता क्लास सुटल्यानंतर तो घरी जायचा. मात्र आता कुणालच्या मृत्यूच्या तपासात त्याच्या गाडीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या दिवशी कुणाल खवड्या डोंगरावर पोहोचला, त्या दिवशी तो गाडी घेऊन गेला होता का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर त्याच्याकडे गाडी होती, तर ती सध्या नेमकी कुठे आहे, याचा शोध घेणं पोलिसांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

कुणालची बाइक कुठं आहे?

कुणाल नेमका खवड्या डोंगरावर कसा पोहोचला? त्याच्यासोबत कोणी होतं का? त्याने त्या दिवशी कोणाशी संपर्क साधला होता का? तसेच त्याची गाडी कुठे आहे हे प्रश्न उपस्थित होत आहेत. अद्याप त्याची बाइक कुठे आहे याची माहिती समोर न आल्याने या तिघांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे. आता पोलिस तपासात कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in