• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुठे आहे तुमचं पर्यावरण मंत्रालय आणि पर्यावरण खातं? संजय राऊत यांचा संताप, थेट..

April 14, 2026 by admin Leave a Comment


संजय राऊत यांनी नुकताच मोठे विधान करत म्हटले की, देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांचा अपमान करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, आखाती देशातील युद्धाचा कोणताही परिणाम भारतावर होऊ देणार नाही. दुसरीकडे फडणवीस म्हणतात की, आखाती युद्धामुळे स्मारक होत नाहीये. मग आखाती देशातील युद्धामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे काय थांबू शकते? विदर्भात खाण उद्योगाने उत्तपाद माजवला आहे. चार दिवसांपूर्वी माझ्याकडे असंख्य राजकीय लोक आणि सामाजिक कार्यकर्ते आले होते. त्यांनी त्यांची वेदना मला सांगितली. रॉयल स्टिल नावाची कंपनी आहे. ही कंपनी जशी की, भारतीय जनता पक्षाची भागीदार असल्यासारखे उत्तपाद माजवत आहे. पाण्याचे झरे, तलाव याच्यामध्ये खनिजे मिश्रत सर्व केमिकल जात आहे. लोकांना प्यायला पाणी नाही. तिथे जो चिखल झाला, त्यामध्ये गायी अडकून मरत आहेत. सात गायींचा जीव गेला.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, हे जे उद्योजक आहेत, यांनी सत्ताधारी पक्षांना मोठंमोठ्या देणग्या दिल्या आहेत. माझी मागणी आहे की, ताबडतोब यांचा परवाना रद्द केला पाहिजे. कुठे आहे तुमचं पर्यावरण मंत्रालय आणि पर्यावरण खातं? झाडे तोडली जात आहेत, त्या भागामध्ये. खाणीच्या नावाखाली.

तुम्ही जो नक्षलवाद संपवला बोलत आहात तो काय या खाण उद्योगाला मोकळ रान देण्यासाठी? खाण उद्योगासाठी नक्षलवाद संपवला की या जनतेसाठी? नक्षलवादाचा त्रास हा अशाच उद्योगांना होता. जे जनतेच्या छातीवर बसून दहशत निर्माण करत होते. त्या आणि या लोकांचा भांडण होतं. जर देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांची आणि सामान्य लोकांची जाणीव असेल तर त्यांनी अशाप्रकारचे पाणी गडूळ करणारे, पाणी विषारी करणारे, शेतजमिनी संपवणारे जे उद्योग आहेत, त्या संदर्भात कठोर भूमिका घ्यायला पाहिजे.

एका उद्योगाकडून देणघ्या घेऊ नका ना… जनतेला वाचवा.. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नवीन जे धोरण आणले, त्यावरही राऊतांनी टीका केली. मुलांचे प्लॅन ग्राऊंड खायची वेळ तुमच्यावर आली का? काय करत आहेत. देवेंद्र फडणवीस असाही सवाल राऊतांनी उपस्थित केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?
  • Rupali chakankar | चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे… रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in