• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुठेतरी बाहेर लफडं..; घटस्फोटाविषयी राहुल देशपांडे नेमकं काय म्हणाले?

April 26, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. लग्नाच्या 17 वर्षांनंतर त्यांनी पत्नी नेहाला घटस्फोट दिला. याविषयीची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहिली होती. या पोस्टनंतर त्यांना अनेकांचे फोन आले होते, मात्र त्यांनी एकही फोन घेतला नसल्याचं सांगितलं. “हा माझा वैयक्तिक विषय आहे, मला कोणाशीच बोलायचं नव्हतं”, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे घटस्फोटानंतर ट्रोलिंग कशाप्रकारची झाली आणि त्याला ते कसं सामोरं गेले, याविषयीही ते व्यक्त झाले.

काय म्हणाले राहुल देशपांडे?

‘मित्र म्हणे’ या पॉडकास्ट मुलाखतीत राहुल देशपांडे म्हणाले, “एखादा अध्याय संपल्यानंतर कशी तुझी चूक होती, कशी माझी चूक होती, असं म्हणतो. पण आमच्यात असं काहीच झालं नाही. हे काही मुद्दामून होत नाही. त्याला विविध कारणं असतात. यात तुमची चूक असते, तुम्हाला वाटतं समोरच्याची चूक असते, त्यामुळे प्रत्येकाच्या दोन बाजू असतात. मला असं वाटतं की विनाकारण आपण त्याचा खूप मोठा बाऊ करतो. मला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. घटस्फोटाची पोस्ट अपलोड केल्यानंतर मी एकही फोन घेतला नाही. मला कोणाशीच बोलायचं नव्हतं. हा माझा वैयक्तिक विषय आहे. मी कसा बरोबर होतो आणि माझ्यावर कसा अन्याय झाला, हे मी का सांगायचं? कारण हे झालेलंच नाही. मग हे सगळं समजावून सांगण्यासाठी एवढा वेळ का खर्च करायचा?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Deshpande (@rahuldeshpandeofficial)

“या सर्व गोष्टींचा नेहा आणि रेणुकाला खूप त्रास झाला. ही जरी वैयक्तिक गोष्ट असली तरी ते कोणच्याही आयुष्यात होऊ शकतं. यामुळे दोन्ही व्यक्ती वाईट ठरत नाहीत. किंवा कोणाची चूक आहे, हा असाच आहे, याला काही अक्कल नाही, याचं कुठेतरी बाहेर लफडं असेल.. या असल्या गोष्टींना काही अंतच नाही”, असं ते पुढे म्हणाले.

सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर करण्याविषयी त्यांनी सांगितलं, “मी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून अत्यंत प्रामाणिक आहे. तुम्हाला सोशल मीडियावर नेहा, रेणुकासोबत माझ्या बऱ्याच पोस्ट दिसतील. त्यामुळे मला असं वाटलं की ही माझी एक जबाबदारी आहे की, जे मला लोक, चाहते मला फॉलो करतात, त्यांना हा अध्याय संपला आहे, याची माहिती देणं. त्यामागे हाच हेतू होता. घटस्फोटानंतर नेहासोबत माझे संबंध खूप चांगले आहेत. आम्ही रेणुकाचे आईवडील आहोत आणि ते कायम राहू.”





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तो साडी घेऊन आला अन् पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्याने अश्लील… डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने मुंबई हादरली
  • IPL 2026, CSK vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, कर्णधार शुबमन गिल म्हणाला की…
  • आयपीएल स्पर्धेत एका दिवसात 16 झेल सुटले, 986 धावा! 14 खेळाडूंच्या चुकीमुळे पहिल्यांदाच असं घडलं
  • आपल्या आराध्य दैवताबद्दल विकृत बरळतो..; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना रितेशने सुनावलं
  • ‘या’ तारखेला जन्मलेले लोक जन्मतः असतात करोडपती, त्यांच्याकडे कधीच नसते पैशांची कमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in