• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काही तरी घडतंय… एकनाथ शिंदे दिल्लीला जाताच गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना, जळगावचा महत्त्वाचा कार्यक्रम मध्येच सोडला

May 23, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ विधान परिषद जागासाठी निवडणूक होत आहे. १८ जून रोजी यासाठी मतदान होत आहे. या १७ जागांसाठी महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळत असतानाच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीसाठी जळगावची जागा मिळवू इच्छीत आहेत. त्यामुळेच मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री दिल्लीसाठी निघाले असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील कार्यक्रम अर्धवट सोडून मुंबईला निघाले आहेत.

कार्यक्रम अर्धवट सोडला

जळगावमधील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. जळगावात गुर्जर समाजाचा कार्यक्रम सुरु असतानाच तो अर्ध्यावर सोडून मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या संदर्भात जळगावची विधानपरिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आणि मंत्री ठाम आहेत. जळगावच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्री गुलाबराव पाटील मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

जळगावच्या विधान परिषदेच्या जागेबाबत मंत्री गुलाबराव पाटल यांची एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जळगावच्या विधान परिषदेच्या जागेवर आपल्या चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागणी केली आहे. आजच भाजपचे नेते आणि महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विधान परिषदेच्या जागेवरून चर्चा पार पडली आहे. उद्या आणि परवा बैठका होत आहेत.तसेच समन्वय समितीची महाराष्ट्र राज्याची बैठक असल्याने त्याचे निमंत्रण असल्याने त्यासाठी आपण मुंबई जात असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. सोमवारपासून विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

 किशोर पाटील यांनी शिंदे साहेबांचा सल्ला घ्यावा…

गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी भाजपासोबत मैत्रीपूर्ण लढत लढली तर आम्ही पूर्ण ताकदीने मदत करू असे वक्तव्य आमदार किशोर पाटील यांनी केले होते. आमदार किशोर पाटील याच्या याच वक्तव्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना टोला लगावला आहे.

.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बघण्याच्या कार्यक्रमातच… केतनच्या काकाने दिली धक्कादायक माहिती, मग सियाने असं का केलं?
  • Ketan Agarwal Case: 2 वेळा फेल झाल्यानंतर 3 कट यशस्वी! थेट सापाचाच बनाव, सियाचे हादरुन टाकणारे कट समोर
  • फक्त 2 लाखांत सुरू केला व्यवसाय, आज 7 कोटींची उलाढाल; पी. एन. ठाकूर यांनी पान टपरीला कसं बनवलं मोठं ब्रँड
  • Shree Charani: एका वर्षात श्री चरणीने केली टी20त कमाल, नंबर 1 गोलंदाज होण्यापूर्वी बरंच काही सोसलं
  • DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना… अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in