• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काळे आणि दाट केस हवेत, मग शॅम्पूऐवजी या नैसर्गिक गोष्टींनी धुण्याची लावा सवय

May 20, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळा सुरू झाला की आपण प्रत्येकजण आरोग्यापासून त्वचेच्या काळजीपर्यंत अनेक उपाय करत असतो. कारण या दिवसांत जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी अनेक समस्या निर्माण होतात. यापासून संरक्षण करण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपायांचा अवलंब करतो. अशातच उन्हाळ्यात आपण केसांच्या काळजीकडे दुर्लक्ष करतो. धूळ, उष्णता, तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. याकडे दुर्लक्ष केल्यास केस गळायलाही सुरुवात होऊ शकते. जेव्हा केस गळायला लागतात, तेव्हा आपल्यापैकी अनेकजण बाजारात उपलब्ध असलेले महागडे शॅम्पू विकत घेतात, कारण त्यांना वाटते की त्यामुळे केसांची सर्वोत्तम काळजी घेतली जाईल.

बाजारात उपलब्ध असलेली काही उत्पादने उत्कृष्ट परिणाम देऊ शकतात, परंतु ते किती काळ टिकतील याचा अंदाज लावणे अशक्य आहे. भारतात केस, त्वचा आणि शरीराच्या देखभालीच्या पारंपरिक पद्धती सर्वोत्तम मानल्या जातात. शॅम्पूशिवाय तुम्ही तुमचे केस काळे, दाट आणि चमकदार कसे बनवू शकता तसेच केसांसाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक उपाय कोणते ते जाणून घेऊयात.

केसांसाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक उपाय

रीठाने तुमचे केस स्वच्छ करा

रीठा हे एक नैसर्गिक क्लीन्झर म्हणून काम करते. फार पुर्वीपासून रीठा हा देशी घटक केस धुण्यासाठी वापरला जात असे. यामध्ये असे अनेक घटक आणि गुणधर्म आहेत जे आपले केस नैसर्गिकरित्या काळे आणि दाट बनवू शकतात. अनेक मोठ्या कंपन्या बाजारात यापासून प्रोडक्ट बनवून विक्री देखील करत आहेत. तुम्ही शॅम्पूशिवाय शिकेकाईने तुमचे केस निरोगी बनवू शकता. यासाठी, रीठा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवा. थोड्या वेळाने या पाण्याने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा असे करणे केसांसाठी उत्तम आहे.

शिकेकाईसह केसांची काळजी

तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांना चमकदार बनवण्यासाठी शिकेकाईचा वापर करू शकता. आयुर्वेदाने शिकेकाईला केसांच्या काळजीसाठी अत्यंत प्रभावी म्हटले आहे. सर्वप्रथम शिकेकाईची पावडर घ्या आणि पाण्यात मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या केसांना लावा आणि अंघोळीपूर्वी 15 मिनिटे तशीच राहू द्या. साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा आणि काही दिवसांतच तुम्हाला या आयुर्वेदिक उपायाने तुमच्या केसांमध्ये फरक दिसून येईल.

आवळा उपयोगी पडेल

आवळा केसांसाठी वरदान मानली जाते. यामध्ये आवश्यक व्हिटॅमिन सी असते, जे केवळ आपल्या त्वचेसाठीच फायदेशीर नाही तर आपले केसही निरोगी ठेवते. आवळ्याची पावडर घेऊन ती पाण्यात मिक्स करा. पेस्ट बनवल्यानंतर ती तुमच्या केसांना लावा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. जर तुम्हाला त्याच्या वासाची काळजी वाटत असेल, तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी ते केसांना लावू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार
  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in