• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कारल्याची बनवा कुरकुरीत भजी, या पद्धतीने बनवल्यास कडूपणा राहणारच नाही; जाणून घ्या खास पद्धत

May 21, 2026 by admin Leave a Comment


कारले पोषक तत्वांचा खजिना आहे आणि म्हणूनच घरातील मोठी लोकं आपल्याला कारल्याच्या भाजीचा आहारात समावेश करण्यास सांगतात. अशातच कारल्याचं नाव ऐकताच लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण तोंड वाकडं करतात. जर कारल्याच्या कडूपणाच्या कारणामुळे तुम्ही कारले बनवणे किंवा खाणे टाळत असाल, तर कुरकुरीत कारल्याची भजी नक्की करून पहा. हे कुरकुरीत चविष्ट कारले अत्यंत स्वादिष्ट लागतात आणि नाश्ता म्हणून त्याचा आनंद घेता येतो.

जेव्हा चविष्ट कारल्याच्या भजीची ही रेसिपी एकदा करून पाहिली, तर आपण कारले खाल्ले आहे हे तुमच्या लक्षातही येणार नाही. चला तर मग कारल्याची कुरकुरीत भजी बनवण्याची ही अनोखी पद्धत जाणून घेऊयात.

कारल्याची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कारल्याची भजी बनवण्यासाठी तुम्हाला 500 ग्रॅम कारले, 1 कप बेसन, 1/2 कप कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ, 1 लिंबाचा रस. चवीनुसार मीठ, लाल मिरची, गरम मसाला, धणेपूड आणि हळद.

कारल्याची कुरकुरीत भजी बनवण्याची रेसिपी

सर्वप्रथम कारले धुवून थोड्स सोलून घ्या. आता, कारल्याचे गोल किंवा आकाराचे बारीक काप करा. मोठ्या भांड्यात पाणी घ्या. या पाण्यात मीठ आणि लिंबू टाकून त्यात कापलेली कारली 15 ते 20 मिनिटे ठेवा.

आता 1 कप बेसन आणि अर्धा कप कॉर्न फ्लोअर घ्या. त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड यांसारखे मसाले टाका आणि सर्व मिश्रण एकजीव करा. या मिश्रणात थोड्या ठेचलेल्या लाल मिरच्या, कसुरी मेथी, तसेच आले आणि लसणाची पेस्ट मिक्स करा. आता त्यात पाणी टाकून घट्टसर पीठ तयार करा. हे पीठ फार पातळे नसावे. आता एका ताटलीत दोन मोठे चमचे कॉर्नफ्लोअर बाजूला ठेवा. आणि त्यात थोडे मीठ आणि काळी मिरी पूड मिक्स करा. आता चिरलेली कारली एक एक करून पिळून घ्या आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्या.

कढईत तेल गरम करा. प्रत्येक कारल्याला कोरडे कॉर्नफ्लोअर लावा. प्रत्येक कारले पिठाच्या मिश्रणात बुडवा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. ही कारल्याची भजी अजिबात कडू लागत नाही आणि तुम्ही नाश्ता म्हणून तिचा आनंद घेऊ शकता.

याच्या मदतीने कारल्याचा कडूपणा दूर करा

कारले कापून लिंबू आणि मीठ घातलेल्या पाण्यात भिजवल्यास त्याचा कडूपणा निघून जातो. त्याचप्रमाणे कारले थोडेसे सुकवल्यानेही त्याचा कडूपणा कमी होतो. तर भाजी बनवताना कारल्यामध्ये भरपूर कांदा घालावा. यामुळे कडूपणा संतुलित होतो. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी आमचूर पावडर देखील उपयुक्त ठरते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in