• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काँग्रेसच्या मुख्यालयात पाप घडलंय, जनता माफ करणार नाही; अमित शहांचा हल्लाबोल

August 16, 2026 by admin Leave a Comment


काँग्रेस कार्यालयातील एका घटनेवरून जोरदार राजकारण पेटलं आहे. या घटनेच्या विरोधात भाजपने जोरदार टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि खासदार सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राजस्थानच्या एका सभेत वंदे मातरमवरून काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस कार्यालयात पाप घडलं आहे. वंदे मातरम गीत अर्ध्यात थांबवण्यात आलं. त्यामुळे जनता सोनिया गांधी यांना कधीच माफ करणार नाही. राष्ट्रगीत अपूर्ण ठेवण्याचे कोणी स्वप्नातही विचार करू शकतो का? काँग्रेसच्या लोकांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात अमित शहा यांनी टीका केली.

अमित शहा यांनी पुढे म्हटलं की, काँग्रेस निर्लज्ज झाली आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात वंदे मातरम गीत सुरू होतं. त्याचेळी सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांनी गीत रोखण्यास म्हटलं. आम्ही सर्व टीव्हीवर पाहत होतो. 80 वर्षांच्या बंकिम चंद्र चट्टोपाध्याय गीताला पुन्हा सन्मान मिळत आहे. परंतु सोनिया गांधी यांना आवडलं नाही. सोनिया गांधी यांना 140 कोटी लोक बघत आहे’.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे म्हटलं की, ‘तुम्ही चुकी केली आहे. त्यामुळे देशाची जनता माफ करणार नाही. ही बाब कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही. काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. थोडीतरी लाज शिल्लक राहिली असेल, तर दोन्ही हात जोडून बंकिम बाबू आणि देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे’.

काँग्रेसने काय स्पष्टीकरण दिलं?

वंदे मातरम गीत रोखण्याच्या कथित वादावर काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सोनिया गांधी फक्त मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खुर्ची मागत होत्या’. काँग्रेसवर टीका करताना भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आणि भारतीयांच्या भावना लक्षात घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहिल्यांदा वंदे मातरम गीत पूर्ण गायले गेले’. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. ‘वंदे मातरमच्या सुरुवातीच्या ओळींनी सोनिया गांधी नाराज झाल्या. त्यांनी संपूर्ण गीत वाजवू दिले नाही. राहुल गांधी यांनीही थांबवण्याचा इशारा दिला, असा आरोप मालवीय यांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in