• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काँग्रेसच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या, मुलालाही सोडले नाही, भयंकर घडलं

August 16, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस नेते अनीसुर रहमान यांची गोळ्या आणि धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. सूत्रांच्या मते, त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यात त्यांचा मुलगा अबू सुफियान यांचाही मृत्यू झाला आहे. अनीसुर हे प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य, नदिया जिल्हा काँग्रेस समितीचे महासेक्रेटरी आणि नकाशीपाडा ब्लॉक काँग्रेस समितीचे माजी अध्यक्षही होते. माहितीनुसार, जेव्हा ते घरी परतत होते, तेव्हा त्यांची कार थांबवली आणि त्यांच्यावर बंदूक व धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

अनीसुर रहमान नकाशीपाडा परिसरातील प्रसिद्ध काँग्रेस नेते होते. ते दीर्घकाळ पार्टीसाठी अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत होते. या हल्ल्याने परिसरात मोठा तणाव पसरला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नकाशीपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाली. तसेच पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

हत्येमागील कारण हा प्रश्न

पोलिसांनी हत्येची कारणे शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. पोलिस हे तपासत आहेत की हल्ल्यामागे कोण होते, या हत्येमागील उद्देश काय होता आणि घटनेत आणखी कोण-कोण सामील असू शकतात. काँग्रेस नेत्याचा मृतदेह सध्या नकाशीपाडा येथील रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

घरापासून केवळ काही अंतरावर झाला हल्ला

घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने सांगितले की, वडील आणि मुलगा घरी जात होते. रेल्वे गेटसमोर ही घटना घडली. घरापासून केवळ २०० मीटर अंतरावर त्यांच्यावर इतका भयानक हल्ला करण्यात आला. ते काँग्रेस पार्टीसाठी काम करत होते. प्रत्येक व्यक्तीसोबत राहत होते, सर्वांसोबत उभे राहत होते. शुल्लक वादांवरुन त्यांच्या शत्रूंनी त्यांना मारले. त्यांच्या मुलालाही का मारले, हे कळत नाही अशी माहिती स्थानिक व्यक्तीने दिली आहे.

प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी केला तीव्र निषेद

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शुभंकर सरकार यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेद केला आहे. त्यांनी संपूर्ण राज्यात रविवारी काळा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले, नदियाच्या काँग्रेस नेते अनीसुर रहमान आणि त्यांचा मुलगा अबू सुफियान यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेद करतो. त्यांनी सांगितले, या राज्यात अल्पसंख्याकांची आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नांविरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in