• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कर्णधार गिल दुसऱ्या डावातही फेल! जमत नाही तो फटका मारला आणि बाद झाला, रहाणे-पुजाराने काढले वाभाडे

August 18, 2026 by admin Leave a Comment

Shubman Gill Wicket: भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्याकडून क्रीडाप्रेमींना फार अपेक्षा आहेत. मात्र पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याने निराशा केली. पहिल्या डावात 28 चेंडूंचा सामना केला आणि 16 धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात 20 चेंडूत 8 धावांवर तंबूत परतला. दोन्ही डावात फेल गेल्याने क्रीडाप्रेमींचा भ्रमनिरास झाला आहे. कारण एकीकडे शुबमन गिल खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील आहे दिसत होतं. पण त्याचवेळी एक असा फटका मारला की त्याची बाद होण्याची इच्छा असावी. गिलने निवडलेला फटका पाहून रहाणे आणि पुजाराही हैराण झाले आहेत. पुजाराने तर गिलची अक्कलच काढली. जो फटका मारता येत नाही तो मारायचा तरी का? असा प्रश्नच पुजाराने उपस्थित केला. गिलने नेमका कोणता फटका मारला आणि पुजारा-रहाणेसह क्रीडाप्रेमी नाराज झाले ते समजून घेऊयात..

गिल स्विप शॉट मारताना बाद

शुबमन गिल स्विप शॉट मारण्यात तितका पटाईत नाही. हे वारंवार दिसून आलं आहे. पण त्याने हा प्रयोग पुन्हा एकदा करून पाहिला आणि फेल झाला. प्रभात जयसूर्याच्या सरळ चेंडूवर त्याने स्विप मारण्याचा प्रयत्न केला. पण पूर्णपणे फसला आणि पायावर आदळला. त्यामुळे पायचीत होत तंबूत परतला. स्विप शॉट मारण्याचा पहिला नियम म्हणजे सरळ येणारा चेंडूवर शक्यतो असा फटका मारू नये. जर तुम्ही त्यात तरबेज असाल तरच असा फटका मारावा, नाही तर प्रयत्नही करू नये. माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी हीच बाब सांगितली.

🔴GILL TRIED TO ACCELERATE – AND PAID THE PRICE🤯

🎙: Cheteshwar Pujara believes Shubman Gill’s weakness against the sweep shot cost him today.

– In an attempt to accelerate the innings, Gill played the shot despite not being strong at it & got out.

Pujara says Gill should… pic.twitter.com/2LAVkKL7u9

— Sam (@cricsam02) August 18, 2026

रहाणे पुजारा काय म्हणाले?

चेतेश्वर पुजारा म्हणाला की, ‘जिथपर्यंत तुम्ही हा फटका मारण्यात मास्टर होत नाही तोपर्यंत असे शॉट खेळू नयेत. जर तुम्ही हा शॉट खेळण्यात योग्य नाहीत, तर नका खेळू. पहिल्यांदा स्विप खेळणं शिकायला हवं. गिलने समोर फटके मारण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण त्याचा डिफेंस खूप चांगला आहे.’ अजिंक्य राहणेने देखील पुजाराचं म्हणणं योग्य असल्याचं म्हंटलं. रहाणे म्हणाला की, ‘स्विप शॉटसाठी तुम्हाला खूप सराव करण्याची गरज आहे. यासाठी योग्य तंत्र असणं आवश्यक आहे. सध्याच्या संघात सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कल यात तरबेज आहेत. गिल स्विप मारण्यात इतका चांगला नाही. त्याचा डिफेंस चांगला असून बॅकफूटवर चांगला खेळतो. गिल हा फटका मारण्यात जिथपर्यंत पारंगत होत नाही तोपर्यंत त्याने असं खेळणं टाळावं.’

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in