• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

करिअर फ्लॉप होण्याची भिती, म्हणून अभिनेत्याने सोडला बंगला, आज 84 व्या वर्षी 450 कोटींचा बनला मालक

July 27, 2026 by admin Leave a Comment


सत्तरच्या दशकातील आपल्या अनोख्या नृत्यशैलीमुळे “जम्पिंग जॅक” म्हणून ओळखले जाणारे अभिनेते जितेंद्र यांनी सहा दशकाहून अधिक मोठ्या कारकीर्दीत २०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे.त्यांचा फर्ज हा चित्रपट १९६७ मध्ये रिलीज झाला होता. कारवा ( १९७१) आणि हिंमतवाला ( १९८३ ) या चित्रपटामुळे ते प्रचंड गाजले होते.

अभिनेते जितेंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितले त्यांनी एका ज्येष्ठ अभिनेत्याचा पाली हिल येथील आलिशान बंगला त्यांनी खरेदी केला होता. या बंगल्यामुळे करियर बुडणार अशी भिती वाटल्याने त्यांनी हा बंगला सोडून दिला. आज त्याची किंमत ४५० कोटी रुपये आहे.

'द रियाल्टी ड्राईव्ह' शी बोलताना त्यांनी सांगितले की ज्येष्ठ अभिनेते भारत भूषण हे आर्थिक अडचणीत होते.त्यांना पैशाच्या कारणाने पाली हिलचा बंगला केवळ ४.२२ लाखांना विकायचा होता.

भारत भूषण त्या काळातील मोठी असामी होती. त्यांनी 'बैजू बावरा'सारख्या क्लासिक सिनेमातून काम केले होते. एकदा त्यांनी मला ही ऑफर दिल्याचे जितेंद्र यांनी सांगितले. त्यावेळी मी वडीलांशी बोललो आणि त्यांना सांगितले की आम्ही देखील एक बंगला विकत घेऊ इच्छीत आहे.

त्यावेळी आम्ही साध्या घरात रहात होतो. 20×10 फुटाच्या घरात माझे बालपण गेले होते. येथे आठ लोक आम्ही दाटीवाटीने रहात होतो. अखेर हा बंगला आपण 4.25 लाखात विकत घेतला. विशेष म्हणजे याच किंमतीत त्यांना 3,450 चौरस फूटाचा एक प्लॉट देखील मिळाला.

या बंगल्यात शिफ्ट झाल्यानंतर मात्र विचित्र घटना घडू लागल्या. माझे चार चित्रपट फ्लॉप झाले. त्यामुळे मला चिंता सतावू लागली की आपण देखील भारत भूषण यांच्यासारखे आर्थिक अडचणीत तर सापडणार नाही ना अशी भिती वाटली आणि अखेर आम्ही हा बंगला सोडून दिला. मात्र, त्यानंतर ही प्रॉपर्टी त्यांच्यासाठी लकी सिद्ध झाली.

actor Jeetendra news

तुम्हाला विश्वास बसणार नाही. जेव्हा या बंगल्याला पाडले, तेव्हा या बंगल्याच्या बर्मा टीकच्या लाकडातूनच आम्हाला ११.५ लाख रुपये मिळाले. आपण संपूर्ण बंगला केवळ ४.२५ लाखात विकत घेतला होता. परंतू तो पाडल्याने केवळ लाकडातूनच आम्हाला ११.५ लाख मिळाल्याचे अभिनेते जितेंद्र यांनी सांगितले. सध्याच्या किंमतीचा उल्लेख करत अभिनेते जितेंद्र म्हणाले की आज ज्या जमीनीवर ही इमारत उभी आहे. त्याचीच किंमत ४५० कोटी आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
  • ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा
  • Kia चा मोठा गेमप्लॅन: भारतीय बाजारात उतरवणार 2 नव्या धासू SUVs, अल्काझार आणि व्हिक्टोरियाला देणार टक्कर
  • Chanakya Niti : महिला जातील यशाच्या शिखरावर, आचार्य चाणक्य यांच्या 4 संदेशाकडे कधीच करू नका दुर्लक्ष!
  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in